May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन

दू : खद घटना :- मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने दुःखद निधन …श्रद्धांजली …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले आणि मनसे परिवारासह मित्र परिवारामधे दुःखाचा सागर उसळला. कारण आकाश भालेराव म्हणजे चालते फिरते सामाजिक न्यायालय होते त्यांनी गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जेंव्हा मराठा आरक्षण क्रांती मोर्चा काढण्यात आला त्या मोर्च्या च्या यशस्वी आयोजनात त्यांच्या मोठा सहभाग होता पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मंडळी शी अगदी जिव्हाळ्याचा सबंध प्रस्थापित करणारे आकाश भालेराव याच्या अकस्मात जाण्याने एक सामाजिक पर्व संपल अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

दहा दिवसांपूर्वी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने अगोदर त्यांना होम कॉरॉनटांइन मधे ठेवण्यात आले होते पण प्रक्रुती बिघडल्याने त्यांना श्वेता हॉस्पिटल मधे ठेवण्यात आले पण व्हेंटिलेटर्स त्यांना मिळाले नसल्याने प्रक्रुती गंभीर झाल्याने शेवटी त्यांना शासकीय मेडिकल कॉलेज मधे रेफर करण्यात आले आणि काही तासातच म्हणजे आज सकाळी पहाटे पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरताच सर्वत्र दुःख व्यक्त होतं आहे विशेष म्हणजे जर त्यांना व्हेंटिलेटर्स मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी पण चर्चा आहे. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो …श्रद्धांजली .

Advertisements
error: Content is protected !!