May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोरोनापेक्षाही असुविधांचे मरण भयावह

कोरोना रुग्णांचे वाढत असलेले आकडे व त्या तुलनेत अपुरे असलेले बेड व व्हेंटिलेटर्स यामुळे कोरोना रुग्णांचा वेळेवर उपचार होतं नसल्याने अनेकांचा दुर्दवी मृतू होत असल्याची उदाहरणे दिसत आहे, अशातच दोन दिवसांपूर्वी भद्रावती येथील जैन मंदिर कोविड सेंटर मधील एका ६० वर्षीय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आल्याने ती उपचार घेत होती. पण तिची अचानक तब्बेत बिघडली असता त्या महिलेला चंद्रपूर मधे हलविण्याचे तेथील डॉक्टरने लिहून दिले, डॉक्टर च्या या सांगण्यावरून त्या महिलेला चंद्रपूर मेडिकल कॉलेज म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील सर्वच रुग्णालयात नेण्यात आले, पण कुठेही बेड मिळाला नाही आणि शेवटी सर्व रुग्णालये फिरल्यानंतर त्या महिलेने अम्बुलँस मधेच जीव सोडला.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील ही केवळ एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडत आहे. रुग्णांना आक्शीजन बेड मिळत नसल्याने त्यांचा जीव जातं आहे पण जिथे लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांनी या गंभीर बाबी कडे गांभीर्याने बघायला हवे तिथे फक्त पेपरबाजी करून प्रशासनाला ते सल्ले देत आहे आणि सरकारकडे विविध मागण्या संदर्भातील बातम्या पेपर मधे झळकावून आम्ही जनतेच्या मदतीला कसे धावून जातो याचे चित्र रंगवत आहे. खरं तर लोकप्रतिनिधी हा जनतेच्या मताने निवडून येतो पण जेंव्हा जनतेला मदत करायची असते तेव्हां हे लोकप्रतिनिधी नेमक्या कुठल्या गुहेत असतात हेच कळत नाही. ज्या अवैध मार्गाने आणि भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये हे लोकप्रतिनिधी कमावतात तिथे जनतेला आरोग्य सुविधा करण्यासाठी हे मागे का? हा गंभीर प्रश्न असून आता तरी जनतेने आपला लोकप्रतिनिधी हा जनसेवक असलेला निवडावा

 दुसरी घटना

रुग्णालयात बेड न मिळाल्याने रुग्णाचा ब्रम्हपुरी बस स्टॉपवर मृत्यू….

ब्रम्हपुरी:- संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून ब्रम्हपुरी येथील रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णाला भरती करण्यासाठी बेड व इतर सामुग्रीचा अत्यंत तुटवडा भासत आहे. त्यातच ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथील प्रवासी निवारा मध्ये एका इसमाचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना घडली आहे.

 

मृतक इसम हा उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे काल सायंकाळी आला, रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण घेऊन आलेल्या वाहनधारका ने रुग्णास व त्याच्या नातेवाईकाला येथील प्रवासी निवाऱ्यात उतरवून वाहन घेऊन निघून गेला, सकाळी तिथले स्थानिक लोक फिरावयास गेले असता ही गोस्ट त्यांच्या लक्षात येताच ब्रम्हपुरी चे तहसीलदार विजय पवार यांना कळविताच घटनास्थळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे ह्यांनी तात्काळ अंबुलन्स ची व्यवस्था केली पण अंबुलन्स पोहोचे पर्यंत रुग्णाने प्राण सोडले. सदर मृतक इसम हा नातवाईका सोबत ब्रम्हपुरीला भिवापूर तालुक्यातील आंभोरा गावामधून आला होता. असे बोलले जात आहे. सदर मृतकाचे ख्रिस्तानद हॉस्पिटल येथील डॉ. कडून रुग्णाला चेकप करून सदर मृतकाचा मृतदेह नगरपरिष येथील कर्मचारी अंत्यसंस्कार करिता स्मशानभूमीत येथे घेऊन गेले

Advertisements

 

सदर वृत्त लिहेपर्यत मृतक इसमाच नाव अध्यापही कळू शकले नाही. हि घटना फार दुर्दैवी असून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार यांचे लक्ष्य आहे काय?असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Advertisements
error: Content is protected !!