May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू

चंद्रपुर शहरातील जलनगर वार्डातील खंजर मोहल्ला आणि बंगाली कॅम्प परिसरात मोहफुलाची अवैध दारू काढून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून रामनगर पोलिसांनी पाच ठिकाणी धाळी घातल्या. यामध्ये सुमारे २२ लाख ७२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. या कारवाईमुळे मोहफुलाची दारूविक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जलनगरमधील खंजर मोहल्ला हा अवैध धंद्यांसाठी प्रचलित आहे. या मोहल्ल्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे अनेकजण राहात असल्यामुळे कमी मनुष्यबळात पोलीस कारवाईसाठी भित असतात. तसेच भागातील दारूविक्रेत्यांसोबत काही पोलिसांचे ‘देवानघेवाण’ असल्यामुळे कारवाई होण्याआधीच संबंधितांना माहिती पुरविली जाते. त्यामुळे घाड घातल्यानंतरही हाती काहीच लागत नाही, असे अनुभव अनेकदा पोलिसांना आले आहे. यावेळी मात्र, पोलिसांनी कुठेही कुणकुण लागू न देता हो कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे

यांच्या आदेशानुसार रामनगर पोलिसांनी अवैध दारूविक्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहीमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. रामनगरचे ठाणेदार रोशन यादव यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर गेल्या दोन महिन्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक, एकरे तसेच रामनगर डीबी पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर एकाचवेळी या धाडी घालण्यात आल्या.

खंजर मोहल्ल्यातील सागर रामकिशोर कंजरकडून 3 लाख 80 हजार, आतिश रामकिशोर कंजरकडून ५ लाख ४० हजार, मुन्नीचाई हरी कंजरकडून 3 लाख ६० हजार, मंदा रामकिशोर कंजर, रामेश रामकिशोर कंजर, दिलीप रामकिशोर कंजर यांच्याकडून 8 लाख 10 हजार रुपये तसेच बंगाली कॅम्प परिसरातील प्रशांत नकुल विश्वासकडून २ हजार ४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. खंजर मोहल्ल्यात मोहफुलाच्या दारूवर कारवाई करण्यात आला. सर्व आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!