May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे

पोलिस उपनिरीक्षक असणाऱ्या सहकारी महिलेला लग्नाचे आमिष दाखून एपीआयने पहिल्यांदा प्रेमसंबंध प्रस्थापित केले. ८ वर्षे प्रेमसंबंध टिकून राहिले. त्यामध्ये अनेकवेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. नंतर एपीआयला बढती मिळाली तर पीएसआय महिलेची बदली झाली. मात्र, एपीआयने इतर दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचे लक्षात येताच महिला पीएसआयने एपीआयविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.संदीप शिवाजी पिसे हे कफ परेड पोलिस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एपीआय पिसे आणि संबंधित पीएसआय महिला दोघेही १०८ क्रमांकाच्या पीएसआय तुकडीचे अधिकारी आहेत.

२०१३ मध्ये दोघांची डोंगरी पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले, त्यातून शरीरसंबंध प्रस्थापित झाले. परंतु, मागील वर्षी एपीआय पिसेला बढती मिळाली आणि पीएसआय महिलेची पुण्यात बदली झाली. नंतरही फोनवर दोघांचे बोलणं सुरू होतं. ज्यावेळी लग्नाची विचारणा महिलेकडून होत होती तेव्हा मात्र पिसे टाळाटाळ करत होता.

मागील महिन्यात एपीआय पिसे दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले. ही माहिती पीएसआय महिलेला मिळाताच पिसेने आपली फसवणूक केली आहे, हे लक्षात आले. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि गुन्हा नोंद केला. एपीआय पिसेवर बलात्कार, विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा या कलमांद्वारे शुक्रवारी गुन्हा दाखल करणयात आला आहे.

Advertisements
error: Content is protected !!