May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई

चंद्रपूर इरई नदीघाट आणि रहेमतनगर परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून रामनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे ६ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध रेती वाहतूकदार जयसिंग आत्राम आणि चेतन पांडुरंग बुटलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हा प्रशासनाने अद्याप रेतीघाटांचे लिलाव पूर्ण केलेले नाही. मात्र, काही रेती तस्कर अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करीत आहेत. वर्ष-दीड वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. आरडाओरड झाली की थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा रेतीची अवैध वाहतूक करण्यात येते. रेतीवाहतूकदारांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, अशी सबब पुढे करीत अनेकदा पोलीस आणि महसूल विभागात संघर्षही झाल्याचे पहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी आता अवैध रेती

 

वाहतूकदारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम हाती घेतली आहे. इरई नदी घाटावर आणि रहेमतनगर परिसरातून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून धाड टाकण्यात आली. जयसिंग मधुकर आत्राम यांच्या मालकीचे वाहन क्रमांक एमएच ३३ जी ०२२१ मध्ये २ ब्रास रेती तसेच चेतन पांडुरंग बुटले यांच्या मालकीच्या अॅप्पे ऑटोतून २० फूट रेती, असा एकूण ६ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार रोशन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक, एकरे, पोलीस उपनिरीक्षक दराळे, सहाय्यक फौजदार ऋषी, पोलीस हवालदार गजानन डोईफोडे, रजनीकांत पुकावार प्रशांत शेंद्रे, पुरुषोत्तम चिकाटे, विकास जुमनाके, संजय चौधरी, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, सतीश अवथरे, लालू यादव, हिरालाल, भावना रामटेके, नीलेश, माजीद, बंडू यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!