May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

मित्रांना एकत्र खर्रा खाणे पडले भारी तपासणी नंतर सर्वच सहाही मित्रा आलें पॉझिटिव्ह

चंद्रपूर( राजुरा) :- तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाला वसाहती जवळील एका चबुतऱ्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्रा चे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणाऱ्या या सर्व मित्रांच्या हे चांगलेच अंगलट आली आहे.

 

वेकोलिच्या सास्ती धोपटाला या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सीमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतऱ्यावर येऊन गप्पागोष्टी करीत टाइमपास करणे, या वसाहतीतिल सहा कामगार मित्रांचा छंद होता. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडला नाही. अर्थात या चर्चेचे वेळी काहींना खरा व तंबाखू खाण्याचा छंद होता.

 

या गोष्टी एकमेकांना आग्रह करून भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खरा अनुभव येत असावा. पण नुकताच यापैकी एकाला ताप आला आणी त्याने

कोरोना तपासणी केली तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान झाले. यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी ठरविले.

Advertisements

तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र पॉझिटिव्ह आले. यापैकी एकाला चंद्रपूरला बेड न मिळाल्याने त्याला अमरावतीला पाठविण्यात आले आहे.

Advertisements
error: Content is protected !!