May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन्‍ससाठी १ हजार लिटर सॅनिटायझर उपलब्‍ध करणार

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

गेल्‍या वर्षी कोरोनाच्‍या प्रादुर्भाव काळात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीनसाठी १६ एप्रिल २०२१ पासून १ हजार लिटर सॅनिटायझर उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे. कोरोनाची वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांचे हे पाउल महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

गेल्‍या वर्षी मार्च महिन्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍थानिक गुन्‍हे शाखा चंद्रपूर, सायबर सेल चंद्रपूर, शहर पोलिस स्‍टेशन चंद्रपूर, रामनगर पोलिस स्‍टेशन चंद्रपूर, वाहतुक शाखा नियंत्रण शाखा चंद्रपूर, दुर्गापूर पोलिस स्‍टेशन, बल्‍लारपूर पोलिस स्‍टेशन, पोलिस स्‍टेशन पोंभुर्णा, चंद्रपूर तहसिल कार्यालय, तहसिल कार्यालय मुल, तहसिल कार्यालय गोंडपिपरी, तहसिल कार्यालय गडचांदुर,  प्रा.आ. केंद्र घुग्‍गुस, ग्राम पंचायत घुग्‍गुस, प्रा.आ.केंद्र बाळापूर, कोविड सेंटर महिला व पुरूष मुल, कोरोना केअर सेंटर नागभिड,  ग्रा.रूग्‍णालय बल्‍लारपूर, ग्रा. रूग्‍णालय पोंभुर्णा, ग्रामिण रूग्‍णालय मुल, ग्रा. रूग्‍णालय राजुरा, ग्रा. रूग्‍णालय गडचांदुर, प्रा.आ.केंद्र.

मारोडा, प्रा.आ.केंद्र, राजोली, प्रा.आ.केंद्र कोठारी, प्रा.आ.केंद्र चिरोली, प्रा.आ.केंद्र बेंबाळ, प्रा.आ. केंद्र नवेगाव मोरे, प्रा.आ.केंद्र चिचपल्‍ली, प्रा.आ.केंद्र दुर्गापूर, प्रा.आ. केंद्र विसापूर, प्रा.आ.केंद्र कळमना, बॅंक ऑफ राजुरा, प्रा.आ. केंद्र साखरवाही, विदर्भ कोकण ग्रामिण बॅंक शाखा घोडपेठ, विदर्भ कोकण ग्रामिण बॅंक शाखा बंगाली कॅम्‍प, जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंक पिपरी धानोरा, चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंक विसापूर, विदर्भ कोकण बॅंक चंद्रपूर, युको बॅंक चंद्रपूर,  एलआयसी ऑफीस मुख्‍य शाखा, चंद्रपूर, राजीव गांधी महाविदयालय बंगाली कॅम्‍प चंद्रपूर, सरदार पटेल महाविदयालय चंद्रपूर, एफ ई एस गर्ल्‍स महाविदयाल,

 

चंद्रपूर, लिंगायत बहु. सामाजिक संस्‍था चंद्रपूर, पंचायत समिती गोंडपिपरी, मारोडा ग्रामपंचायत, प्रधान डाकघर चंद्रपूर, बांबु प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, नगर पंचायत पोभुर्णा, पोलिस मुख्‍या‍लय चंद्रपूर, व्‍यंकटेश गॅस एजंसी बल्‍लारपूर, साईमंदिर चंद्रपूर, गजानन महाराज मंदिर चंद्रपूर, कन्‍यका माता मंदिर चंद्रपूर, महाकाली मंदिर चंद्रपूर, आश्रय चंद्रपूर, पत्रकार भवन चंद्रपूर, नालंदा क्रिडा मंडळ, चंद्रपूर इत्‍यादी 60 ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. आता पून्‍हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन रूग्‍णसंख्‍या वाढत असल्‍यामुळे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी १ हजार लिटर सॅनिटायझर उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्‍येक ऑटो‍मॅटीक सॅनिटायझर मशीनसाठी ५ लिटर सॅनिटायझर उपलब्‍ध करण्‍यात येणार असून यासाठी भाजपाचे महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे मो. नं. ९७६७१७०९८२ व महानगर महामंत्री ब्रिजभुषण पाझारे  मो.नं. ९८५०८८७७४४ यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

Advertisements
error: Content is protected !!