May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

श्रमिक पत्रकार संघ आणि चंद्रपूर मनपा यांच्या पुढाकाराने पत्रकारांचे कोविड लसीकरण

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ आणि चंद्रपूर शहर मनपा यांच्या पुढाकाराने शहरातील वेकोलीच्या क्षेत्रीय रुग्णालयात पत्रकारांचे कोविड लसीकरण पार पडले.पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी पत्रकारांना लसीकरणाबाबत महापौर राखीताई कंचर्लावार आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांना विनंती केली होती. 10 एप्रिल रोजी लालपेठ क्षेत्रीय रुग्णालयात याप्रसंगी स्वतः महापौर राखीताई कंचर्लावार, सभापती रवी आसवानी, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष प्रशांत देवतळे, सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांच्यासह वेकोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रागडे, डॉ. चौधरी, मनपाच्या डॉ. खेरा आदींची उपस्थिती होती. वेकोलीच्या वतीने मान्यवर मनपा पदाधिकारी आणि पत्रकारांचे लसीकरण झाल्यावर पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. शहरातील विविध पत्रकार संघटनांशी संबंधित 45 वर्षे वयावरील सुमारे 25 पत्रकारांनी याचा लाभ घेतला. पत्रकार महेंद्र ठेमस्कर, प्रमोद काकडे, जितेंद्र मशारकर, आशीष अम्बाडे, साईनाथ सोनटक्के, सुशील नगराळे, श्रीकांत पेशट्टीवार, विनोद बदखल , अमित वेल्हेकर,  संजय बाराहाते, बाळू रामटेके, रोशन वाकडे, कमलेश सातपुते, गौरव पराते, हैदर शेख, अभिषेक भटपल्लीवार, राम सोनकर, राजू अलोणे, तेजराज भगत, चिन्ना बामनांटी, वैभव रुयारकर, राजेश सोलापन, पुरुषोत्तम चौधरी, विनोद पन्नासे,सुनील बोकडे, आदींची यावेळी उपस्थिती होती. श्रमिक पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल संघाचे सचिव प्रशांत विघ्नेश्वर यांनी मनपा आणि वेकोली प्रशासनाचे आभार मानले.

Advertisements
error: Content is protected !!