May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

कंत्राटी कामगाराच्‍या डेरा आंदोलनाला भाजपाचा पाठींबा

चंद्रपूर शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्‍णालय येथील 500 कंत्राटी कामगार कुटुंबासह डेरा आंदोलनासाठी बसले आहेत. या कंत्राटी कामगारांना कोरोना काळातील कामाचे वेतन न दिल्‍यामुळे हे आंदोलन चालु आहे. हे कामगार कोरोना योध्‍दा आहेत मात्र् त्‍यांचे वेतन न देता त्‍यांचे शोषण सुरू आहे. त्‍यांचे थकीत वेतन त्‍वरीत देण्‍यात यावे, अशी मागणी करत भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेने या आंदोलनाला पाठींबा जाहीर केलेला आहे.

भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवाणी, सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, पंकज अग्रवाल, धम्‍मप्रकाश भस्‍मे, रू्द्रनारायण तिवारी, चंदन पाल, रामकुमार आकापल्‍लीवार यांनी या आंदोलनाचे प्रणेते नगरसेवक श्री. पप्‍पु देशमुख यांना पाठींब्‍याचे पत्र् सादर केले. सदर कंत्राटी कामगारांच्‍या थकीत वेतनाबाबत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात विनीयोजन विधेयकावरील चर्चेदरम्‍यान शासनाचे लक्ष वेधले. मात्र् संवेदनाहीन शासनाने याकडे सातत्‍याने दुर्लक्ष केल्‍याचे डॉ. मंगेश गुलवाडे म्‍हणाले. या आंदोलनाला भाजपाचा पुर्ण पाठींबा असल्‍याचे महापौर सौ. कंचर्लावार म्‍हणाल्‍या.

Advertisements
error: Content is protected !!