April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

मोटर सायकल चोरी करणारा तसेच एटीएम फोडुन चोरी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर नी केला गजाआड

चंद्रपुर जिल्हयात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने मा. पोलीस अधिक्षक अरवींद साळवे सा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना आळा घालण्याकरीता उपाय योजना करण्यास आदेशीत केले. त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब साडे यांनी पो.उप. नि. संदीप फापडे, स.फौ. सुरेश केमेकर, पो.शि. गणेश भोयर, गणेश मोहुर्ल, प्रदीप मडावी, मयुर येरणे, संजय वादई, विनोद जाधव स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे पथक गठीत करून त्यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करून गुन्हयांवर आळा घालण्याकरीता योग्य त्या सुचना देवुन योजना आखल्या. योजनेप्रमाणे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पथकाने कामास सुरूयात केली.

 

दरम्यान पथक प्रमुखास दि. 05/04/2020 रोजी गोपणीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, अदीलाबाद येथे राहणारा जुनेद शेख इब्राहीम शेख नावाचा ईसम होन्डा शाईन मोटर सायकल विकण्याकरीता कोरपना शहरात फिरत असुन त्याचे जवळ असलेली मोटर सायकल ही चोरीची असल्याची शक्यता आहे. अशा माहीतीवरून पथकाने सापळा रचुन आरोपी नामे जुनेद शेख ईबाहीम शेख वय 19 वर्ष रा. आदीलाबाद याचा पाठलाग करून त्यास मोटर सायकलसह ताब्यात घेतले व त्याचे जवळ असलेल्या मोटर सायकल बाबत माहीती घेतली असता सदर मोटर सायकल पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथुन चोरीस गेली असल्याची माहीती मिळाल्याने, नमुद आरोपीस ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता तो मोटर सायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार असुन त्याने तेलंगाणा राज्य तसेच महाराष्ट्रातुन बऱ्याच मोटर सायकली चोरी केल्या असुन महाराष्ट्रातुन चोरी केलेल्या मोटर सायकली तेलंगाणा राज्यात जावुन विक्री करतो व तेलंगाणा राज्यातुन चोरी कोलेल्या मोटर सायकली महाराष्ट्रात आणुन विकी करतो असे निष्पन्न झाले. त्यावरून वरील पथकाने अत्यंत शिताफीने आरोपीने चोरलेल्या मोटर सायकलीची माहीती गोळा करून आरोपीकडुन 11 मोटर सायकली हस्तगत केल्या. सदर मोटर सायकलीपैकी पो.स्टे. विरूर परीसरातुन 01 मोटर सायकल व पो.स्टे. बल्लारशाह परीसरातुन एक मोटर सायकल, पो.स्टे. पांढरकवडा जिल्हा यवतमाळ परीसरातुन 02 मोटर सायकल चोरीस गेलेल्या असुन उर्वरीत 07 मोटर सायकली तेलंगाणा राज्यातील विधीच पोलीस स्टेशन परीसरातुन चोरीस गेलेल्या आहेत.

सदर आरोपी मोटर सायकल चोरीचे गुन्हे करण्याचा अट्टल गुन्हेगार असुन त्याचे विरूदध एटीएम मशीन फोडुन चोरी केल्याचा गुन्हा तेलंगाणा राज्यातील आदीलाबाद येथे नोंद आहे. सदर आरोपीकडुन अधिक मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेच पथक तपास करीत आहेत.

Advertisements
error: Content is protected !!