April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

बैंक ऑफ महाराष्ट्र वरोरा शाखा ठेंमुर्डा तिजोरी व एटीएम फोडुन दागीने व रोख रकमेची चोरी करणारी आंतरराज्यीय चोर टोळी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी आवडल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे शाखा व  सायबर सेल महाराष्ट्र सगळ्यात मोठी कारवाई चंद्रपूर पोलीसांना यंश

बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा ठेंमुर्डा येथील मॅनेजर यांनी दि. 20/03/2021 रोजी पो.स्टे, वरोरा येथे तकार दिली की, 19/03/2021 चे 20:15 ते 20/03/2021 चे 07.00 वा. दरम्यान अज्ञात चोरटयांनी बँकेच्या ईमारतीथी मागील खिडकी गॅस कटरने कापुन आत प्रवेश करून बंकेचे चॅनल गेटवे कुलुप तोडुन आतील लोखंडी तिजोरी गैस कटरने कापून त्यात ठेवुन असलेले नगदी 6 88.130 /- रू. व 93.100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा एकुण 11.35,010/-रू. ची माल चोरून नेला, अशी तकार दिली. त्यावरूন पो. स्टे.वरोरा येथे अपक 249/2021 कलम 457, 380 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

सदर गुन्हयाची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो नि. जितेन्द्र बोबडे, पो.उप.नि. संदीप कापडे हे स्टाफ सह लगेच घटनास्थळावर दाखल होदुन घटनास्थळाची पाहणी केली सदर घटनास्थळाला पुलिस अधिक्षक अरवींद साळवे,  चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,  चंद्रपुर यांनी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली. व सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या स.पो.नि. जितेन्द्र बोबडे व दहा कर्मचारी तसेच पो. उप नि. संदीप कापडे व दहा कर्मचारी असे दोन पथके तयार करून तपास सुरू केला. सदर वेळी घटनास्थळी श्वान पथक, अंगुली मुद्रा पथक, सायबर पथक यांना पाचारण करून घटनास्थळाची व परीसराची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी बॅकेतील पुर्ण सी सी टी व्ही कॅमेरे काढुन शेतात फेकलेले होते व काही कॅमेरे फोडलेले होते. तसेच डि वी आर चे कनेक्शन कट केलेले होते, अलार्म सिस्टीमचे वायर कट करून ईलेक्ट्रीक सप्लायचे मेन फ्युज काढुन ठेवलेले होते. तसेच तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ऑक्सीजन सिलेंडर घटनास्थळापासुन एक कि.मी अंतरावर शेतामध्ये कडव्याने झाकून ठेवलेले आढळले. सदर सगळया यायींची सांगड घालून, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पुढील तपास सुरू केला.

त्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रीक बाबींचे विष्लेशण करण्यात आले त्यानंतर माही प्राप्त झाली की, याच गुन्हयाप्रमाणे सन 2013 मीजा माढेळी येथे गुन्हा घडला होता व त्यामध्ये काही आरोपी वेगवेगळ्या राज्यातुन अटक करण्यात आले होते तसेच गेल्या एक महीन्याचे कालावधीत अशाच प्रकारचे भंडारा गोंदीया या जिल्हयात देखील गुन्हे घडलेले आहेत. तसेच तेलंगाणा राज्यात देखील गुन्हा घडलेला आहे.
गुन्हयाची मोडस ऑपरेंडी एकसारखी असल्याचे दिसुन आले. त्यानुसार सदर गुन्हयाची सवीस्तर माहीती घेहन तात्रीक विश्लेशण व मोडस ऑपरेंडी याचेवर सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. जितेन्द्र बोबडे। यो उप नि संदीप कापडे यांनी सतत तपास केला, सदर तपासादरम्यान सदरचा हा उत्तर प्रदेश राज्यातील बदायु

जिल्हयात असणा-या ककराला गावातील व काही महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आले. वरील माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकाने दि. 26/03/2021 रोजी रात्री दरम्यान गोंदीया जिल्हयातील गिरोला हेटी गावातुन देवीदास रूपचंद कापगते, राजु वसंत वर्भ व संकत तेजराम उके यांना पडोली जिल्हा चंद्रपुर येथुन ताब्यात घेवून त्याचे कडे सखोल तपास केला. त्यांनी सदर गुन्हा उत्तर प्रदेश राज्यातील ककराला गॅग मधील सहा ईसमांसह मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे कडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी सदर गुन्हयामध्ये वापरलेले वाहन राज वर्ग याचे मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisements

सदर तपासामध्ये वर नमुद अटक आरोपीकडुन ककराला गॅगच्या सर्व आरोपींचे नाव व सहण्याचे ठिकाणे निष्पन्न करण्यात आले. त्यानुसार सदर आरोपींना अटक करणे कामी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर पांचे आदेशाने स.पो.नि. जितेन्द्र बोबडे व पो.उप.नि. संदीप कापडे यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेच्या नउ लोकांचे पथक तयार करून उत्तर प्रदेश राज्यातील बदायु जिल्हयाकरीता मा. पोलीस महानिरीक्षक नागपुर परीक्षेत्र नागपुर यांचे परवानगीने रवाना करण्यात आले. सदर पथकाने बदायु येथे पोहचुन तेथील मा. वरीष्ठ पोलीस अधिक्षक सा. यांना भेटुन सदर गुन्हा द आरोपी बाबत माहीती दिली. त्यांनी त्याचे स्पेशल ऑपरेशन चे अधिकारी व कर्मचारी मदतीला दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक मिळुन दि. 29/03/2021 पसुन ऑपरेशन ककराला ला सुरुवात करण्यात आली. सदर वेळी स्थानिक गोपणीय बातमीदार सकीय करून आरोपीच्या छावठीकाणाबददल माहीती संकलीत करण्यात आली त्यावेळी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नवाबउल हसन हा दोन राज्यातील पाहीजे असलेला आरोपी असुन त्याचेवर पोलीस अधिक्षक कार्यालय जबलपुर यानी उदघाषणा नोटीस काढली आहे अशी माहीती मिळाली.

सदर तपास पथकाला दि. 31/03/2021 यातील मुख्य आरोपी नवाबउल हुसन हा हसनपुर येथे त्याचा साथीदार दानवीर उर्फ गॅसटु याला भेटण्याकरीता येणार आहे अशी माहीती प्राप्त झाली त्यावरून तपास पथकाने आसपुर ते आलापुर मार्गावर वेगवेगळ्या चार ठिकाणी चार पथक तयार करून त्यांना आरोपीचे वर्णन देवन गोपणीय पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी एका पथकाला माहीती प्राप्त झाली की, यातील मुख्य आरोपी नवाबउल हसन हा त्याचा साथीदार नामे दानविर उफ्फ गॅसट सह हसनपुर ते आलापुर मार्गावरील शेताजवळ थाबुन आहेत. त्यावरून सर्व पथकांना याबाबत माहीती देवुन स.पो.नि. जितेन्द्र बोबडे व पी.उप नि. संदीप कापडे सह ना.पो सि. अविनाश दशमबार व एस ओ जी बदायुचे पो.शि. मनोज यांचे सह दोन्ही आरोपींना प्कडण्याकरीत गेले असता दोन्ही आरोपींनी त्यास प्रतीकार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये स.पो.नि. जितेन्द्र बोबडे धाचे हाताला जबर दुखापत झाली तसेच पो. उप नि संदीप कापडे यांचे हाताला सुदधा किरकोळ स्वरूपाचा मार

लागला. तरी देखील सदर अधिकारी यांनी खचून न जाता सोबत असलेल्या स्टाफचे मदतीने योग्य बळाचा वापर करून सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर वरील ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक आलापुर पोलीस ठाणे जिल्हा यदायु येथे नेदुन त्यांना सदर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली. त्यांचे कडे अधिक तपास करणे कामी स्थानिक न्यायालयाकडुन ट्रान्झीस्ट रिमांड घेवुन तपास करण्यात आला त्यांचे कडे सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा ककराला उत्तर प्रदेश येथील 06, चंद्रपुर जिल्हयातील 02 व गोंदीया जिल्हयातील 01 अशा एकुग c9 आरोपींनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांचे कबुलीप्रमाणे मुख्य आरोपी नामें नवाबुल हसन याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन 120 प्रकारचे पिवळया धातुचे 2 किला 800 ग्रॅम जनाचे वेगवेगळे दागने मिळुन आले. तसेच ईतर आरोपींचा शोध घेतला असता त्यांना मुख्य आरोपी यकडल्या गेल्याची माहीती सरी

जिल्हयात पसरल्याने ककराला गावातील सगळे आरोपी गाव सोडुन पळुन गेले. यातील दोन्ही नमुद आरोपींना मा. न्यायालयाची न्यायालयीन प्रकीया पुर्ण करून चंद्रपुर येथे घेवुन आले व आरोपींना वरोरा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. नमुद आरोपींकडून खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला.

1वर्णन  किंमत  120 नग वेगवेगळ्या प्रकारचे पिवळया धातुचे (सोन्याचे) 1,01,10,000/-

किलो 800 ग्रॅम वजनाचे दागीने

गुन्हयात वापरण्यात आलेले पांढऱ्या रंगाचे बोलेरो वाहन

क. एम एच 34 ए एम 6250

ATM व बॅक फोडण्याकरीता वापरण्यात येणारे 25,000/ रू. ऑक्सीजन सिलेंडर 2 नग व अॅसीटीलीन सिलेंडर

एक नग जळालेल्या अवस्थेतिल DVRS मशिन
सोन्याचे वजन मोजण्याची मशिन

बेन्टेक्स ज्वेलरी 5,000/रू ..5,000/-रू…10,000/-रू..5000/-रू

गॅस पाईप, गॅस कटर टार्च, ऑक्सीजन पाईप, ऑक्सीजन 9300/- रू रेग्युलेटर, सी एन जी गॅस रेग्युलेटटर,कटर मशिन

स्कू डायवर 2 नग, दोन मोठया छन्न्या, एम टॉमी, एक सब्बल, हॅन्ड कटर, ड्रिल मशिन

चांदीचे विवीध प्रकारचे भांडे एकुण 30,000/-रू.20,000/- रू 20,000/-रू.1,07,34,300 एक करोड सात लाख.चौतीस हजार तिनशे रू.

सदर आरापींना दरोरा न्यायालयासमोर हजर करून दि. 08/04/2021 पावेतो पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले आहे, सदर आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी टेंमुर्डा जिल्हा चंद्रपुर येथील महाराष्ट्र बँकेतील गुन्हा व त्याच बॅकेत सन 2019 साली केलेला एक गुन्हा तसेच भंडारा जिल्हयात 05, गोंदीया जिल्हयात 03, व तेलंगाणा राज्यात 01 असे एकुण 11 गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपींकडे अधिक तपास करून सदर गुन्हयातील चोरलेली मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे. तसेच या व्यतीरीक्त आणखी काही महाराष्ट्र व ईतर राज्यात काही गुन्हे केल आहेत काय? याबाबत तपास करण्यात येत आहे. तसेच त्यांचे ईतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक  अरवींद साळवे, अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो. नि. जितेन्द्र बोबडे, पो.उप नि. संदीप कापडे, . नितीन जाधव,  महेन्द्र भुजाडे,  अविनाश दशमबार, अनुप डांगे, पोशि. सतिश बगमारे, प्रफुल मेश्राम, कुंदन बावरी, अमोल धंदरे, प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली असुन तांत्रीक विष्लेशणाकरीता सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नीशीकांत रामटेके,  मुजावर अली, प्रशांत लारोकर . छगन जांभुळे, ईमराननी केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!