April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

भवानजीभाई महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी शिक्षकाला केली अटक

भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने लैंगिक सुखासाठी नकार देणाऱ्या विद्यार्थिनींचा मानसिक छळ करून अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हितेश मडावी या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात संताप व्यक्‍त केला जात आहे.ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थिनींकडे सातत्याने शारीरिक सुखासाठी रेटा लावला होता. त्यांना अश्लिल संदेश पाठविणे, अश्लिल फोटो पाठविणे तसेच फोन करून सतत विद्यार्थिनींना छळणे सुरू होते. मात्र, या विद्यार्थिनीनी भिक घातली नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांनी रंगपंचमीच्या दिवशी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात जावून धिंगाणा घातला. हा प्रकार सहनशक्तीच्या पलिकडे झाल्याने या विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आणि पोलिसांकडे तक्रार नोंदविली.त्यानंतर पोलिसांनी हितेश मडावी या शिक्षकाला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत

Advertisements
error: Content is protected !!