April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

पराग डागा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू.

भद्रावती परिसरातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी असलेला पराग बंडू गाडगे ( वर्ष २२) हा दिनांक १९ मार्च पासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिस स्टेशन मधे पालकांनी नोंद केली होती. हा विद्यार्थी भद्रावती मध्ये औधोगिक प्रशिक्षण घेत होता दरम्यान १९ तारखेला आपले प्रशिक्षण आटोपून तो आपल्या शेतात गेला अशी माहिती असून तो डागा माईन्स कंपनीच्या खदानी तील पाण्यात सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान स्वतःची गुरे पाणी पाजताना तोल जाऊन पाण्यात पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला.

मुलगा घरी न परतल्यावर घरच्यांनी भद्रावती पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली होती, जवळपास दोन-तीन दिवस सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेच मिळून आला नाही मात्र दिनांक २२ मार्चला गावातील नागरिक नाल्यावर गेले असता प्रेत तरंगताना दिसून आले. याची माहिती भद्रावती स्टेशन ला तात्काळ देण्यात आली. घटनास्थळी भद्रावती पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.या घटनेने या परिसरातील जनतेत शोककळा पसरली आहे.

Advertisements
error: Content is protected !!