April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

भविष्‍यात आगीपासून प्रकल्‍पाच्‍या इमारतींचे पुर्णपणे संरक्षण व्‍हावे याचा सखोल अभ्‍यास करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

आ. मुनगंटीवार यांनी दिली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट

केंद्रीय वनमंत्र्यांना करणार सादरीकरण

चिचपल्‍ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हा चंद्रपूर जिल्‍हयाचा गौरव जागतीक पातळीवर व्‍हावा अशा पध्‍दतीचा प्रकल्‍प आहे. रोजगार निर्मितीच्‍या प्रक्रियेमध्‍ये हा प्रकल्‍प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्‍पाच्‍या उभारणीच्‍या कामात यत्किंतचही चुक होता कामा नये. भविष्‍यात आगीपासून प्रकल्‍पाच्‍या इमारतींचे पुर्णपणे संरक्षण व्‍हावे याचा सखोल अभ्‍यास करुन त्‍यादृष्‍टीने उपाययोजना करण्‍यात यावी अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

दिनांक १६ मार्च रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्‍ली येथील बांबू संशोधन केंद्राला भेट देत पाहणी केली. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या ज्‍या समस्‍या आहेत त्‍या संबंधी एक सादरीकरण तयार करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. हे सादरीकरण केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍या समक्ष करुन हे केंद्र आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे व्‍हावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार बोलताना म्‍हणाले. पुन्‍हा नव्‍याने इमारत उभारताना जरी सिमेंटची उभारली तरीही त्‍याचे दर्शनिय स्‍वरुप बांबू सारखे असावे असेही यावेळी बोलताना म्‍हणाले. यासाठी आवश्‍यक निधीची मागणी विभागाने करावी, आपण त्‍याचा पाठपुरावा करु असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

Advertisements

यावेळी चंद्रपूर वनवृत्‍ताचे मुख्‍य वनसंरक्षक श्री. प्रविण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या संचालक श्रीमती अपर्णा, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्‍या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता श्री. भास्‍करवार, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Advertisements
error: Content is protected !!