April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

दिवसा घरफोडी करणार्या सराईत चोरट्यास अटक …. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर याची कारवाई

दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरास शिताफीने अटक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची प्रशंसनिय कामगिरी

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये दिवसा घरफोडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. अशा गुन्हयांना आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष नि्देश दिले होते त्या निर्देशानुसार अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला. होता दिनांक ११/०३/२०२१ रोजी सायंकाळी १८.०० वाजण्याचे सुमारास गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी नामें विजय बंडु चटको, वय २४ वर्ष, रा. अमराई वार्ड घुग्घुस, ता.जि. चंद्रपुर याने घुग्घुस येथील एका घरातुन सोन्या-चांदीचे दागिणे व नगदी रुपयांची चोरी केली असुन त्याचेकडे चोरी केलेले दागिणे व पैसे आहेत. मिळालेल्या खबरेवरुन तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना पाचारण करुन पथकामार्फत सदर आरोपी चा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन विश्वासाने विचारपुस केली असता त्याने घुग्घुस पोलीस ठाणेचे हद्दीतील साईनगर वार्ड क्रमांक ६ येथील एका घरातून चोरी केल्याची कबुली देऊन केलं गुन्ह्याबाबत हकीकत कथन केली.

त्यांचे ताब्यातुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे वजन ५९.०३० ग्रॅम किंमत २,६५,६३५/- रु., चांदीचे दागिणे वजन ३४.५७० ग्रॅम किंमत २,२४६/- रुपये, एक एल.वाय एफ कंपनीचा मोबाईल आय.एम.ई.आय क्र. ९११५१०५५८२४२२७३ किंमत अंदाजे ३०००/- रुपये, नगदी ९५००/- रुपये असा एकुण २,८०,३८१/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत. ताब्यातील आरोपी कडून खालीलप्रमाणेचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस ठाणे घुग्घुस अप.क्र. २१/२०२१ कलम ४५४ ३८० भा.दं. वि. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक . अरविंद साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सचिन गदादे, पो.हवा. संजय आतकुलवार, चंदु नागरे, अमजद खान, कुंदनसिंग बाबरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, नरेश डाहुले यांनी केली आहे.

Advertisements
error: Content is protected !!