April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चिमूरमध्ये ‘ते’ दारू माफिया ‘सैराट’ !

चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये दारू खुले-आम विकली जात आहे, यात तिळमात्र ही शंका नाही. मोहल्ला कमेट्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारूचा पुरवठा होत आहे. आता यात चिमूर तालुका ही मागे राहिलेला नाही. चिमूर तालुक्यामध्ये सध्या ‘ते’ दार माफिया सैराट झाले असून त्यांच्यावर पोलिसांकडून मुद्दामहुन दुर्लक्ष केल्या जात आहे. चिमूर तालुक्यातील हॉटेल, पानटपरी, बाजार चौक, ग्रामपंचायत व बस स्टॅन्ड आदि ठीकाणी ही दारू -विक्री खुले आमपणे सुरू आहे. पोलिसांच्या नाकावर निंबू पिळून सुरू असलेल्या या दारू विक्रीमध्ये ‘ते’ तिन दारू माफिया सध्या सैराट झालेले

आहेत. : (खांबाळा), (हिंगणघाट), (भिवापूर) हे तीन ही दारूमाफीया चिमुर तालूक्यात दारू पुरवठ्याचे काम खुलेआम पने आप-आपल्या क्षेत्रात करीत असल्याची चर्चा दारू-माफीया कडून होत आहे. यांना पुर्णपणे पोलीसांचा आशिर्वाद असल्याचे दिसुन येत आहे म्हणूनच यांचा दारूपुरवठा बिनधास्तपणे चिमुर तालूक्यात होत आहे. या मुळे दारू माफीया, सट्टा किंग, जनावर तस्कर किंवा रेती माफीया यांची दादागीरी दिवसाना दिवस वाढतच असल्या दिसुन येत आहे.सामान्य जनतेला किंवा पत्रकाराना महीती दिल्यास धमक्या देने, गुंडे गीरी करून मार हान करने,हॉफ मडर करणे किंवा खुन करणे अश्या प्रकाचे प्रकरण माफीया खुले आम पणे करीत असतात.यांच्या मुळ सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. या सर्वांवर पोलीस विभागाने देख-रेख करून मुसक्या आवरणे गरजेचे आहे.जेने करून माफीया कडून मोठी घटना घडू नये.

या तिन दारू माफियांना पोलिस विभागाकडून संरक्षण मिळत असल्यामुळेचं त्यांनी चिमूर तालुक्यात बेधडक दारूचा पुरवठा करण्याचे कार्य सुरू केले आहे. तालुक्यातील पानटपऱ्या, हॉटेल व अन्य ठिकाणी दारूचा पुरवठा या तिन माफियांकडूनचं होत असल्याचे बोलल्या जाते. चिमूर तालुक्यातील या दारू विक्रीवर आळा बसविण्यात पोलिस प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसत आहे. या तिन दारू माफियांच्या मुसक्या पोलिस कधी आवळतात, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Advertisements
error: Content is protected !!