April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारावरील परप्रांतियांचा हल्ला परतवून लावण्यासाठी रोजगार देतांना पोलिस चारित्र प्रमाणपत्राची अट अनिवार्य करा – आ. किशोर जोरगेवार

स्थानिकांना रोजगारात प्राथमीकता देण्यासाठी अधिवेशनात मागणी

चंद्रपूरात औदयोगीक क्षेत्र मोठे आहे. परिणामी येथे रोजगार उपलब्धता अधिक आहे. असे असले तरी मात्र बाहेरील लोकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येत असल्याने चंद्रपूरचा युवक बेरोजगार आहे. त्यामूळे पोलिस विभागाने मोहिम राबवत स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारावरील परप्रांतियांचा हल्ला परतवून लावण्यासाठी रोजगार देतांना पोलिस चारित्र प्रमाणपत्राची अट अनिवार्य करावी अशी मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, सिध्दबल्ली, गोपानी, धारीवाल, सिएसटीपीएस, वेकोली असे मोठे रोजगार देणारे उदयोग चंद्रपूरात आहेत. त्यामूळे येथे कामागरांच्या अपघाताचे प्रमाणही अधिक आहे. याठीकाणी एकादी अपघात झाल्यास कारखाना मालकाला सर्व प्रथम मदत करण्याची भुमीका येथील पोलिस प्रशासनाची असते त्यामूळे पोलिस विभागाने कामगार व जनतेच्या बाजूने काम करावे अशा सुचना पोलिस विभागाला देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमूख यांना केली.

तसेच येथील उदयोगांमध्ये काम करण्यासाठी बाहेर राज्यातून कामगार आनले जातात त्यांच्याकडून 12 ते 16 तास काम करुन घेतल्या जात आहे. त्यामूळे येथील युवक हक्काच्या रोजगारापासून वंचित आहे. ही बाब लक्षात घेता पोलिस विभागाने मोहिम राबवून पोलिस चारित्र प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही उदयोगांमध्ये काम दिल्या जाणार नाही अशी भूमीका घ्यावी अशी मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली.

अधिवेशात मागणी – गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला नवे पोलीस आयुक्ताल देण्यात यावे आ. किशोर जोरगेवार

Advertisements

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हांना अनेक राज्यांच्या सिमा लागून आहे. त्यामूळे या जिल्हांचे महत्व अधिक आहे. तसेच या दोनही जिल्हांमध्ये दारुबंदी असल्याने येथील गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेता येथील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याकरीता या दोनही जिल्हांना नवे पोलिस आयुक्तालय देण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज अधिवेशनात बोलतांना केली.

यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर आणि गडचीरोली ही नक्षलग्रस्त जिल्हे आहे. त्यामूळे येथे पोलिस प्रशासन काम करत असतांना त्यांना येणा-या अडचणींची मला जाणीव आहे. छत्तीगड, मध्यप्रदेश आणि तेलगंना या तिन राज्यांच्या सिमा या दोन जिल्हांना मिळतात. या जिल्हांमध्ये उदयोगधंदे अधिक आहे. वनक्षेत्र अधिक आहे. त्यामूळे या जिल्हांकडे विशेष लक्ष देत येथे नवे पोलिस आयुक्तालय देण्यात यावे, चंद्रपूरात दारुबंदी, औदयोगीकर असल्याने येथे गुन्हेगारीचेही प्रमाण अधिक आहे. त्यामूळे येथील पोलिसांना विशेष साधने देण्याची गरज असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले,
तसेच चंद्रपूरात सातत्याने घडत असलेल्या हत्तेंच्या प्रकरणाकडेही आ. जोरगेवार यांनी गृहविभागाचे लक्ष वेधले. दारुबंदी नंतर वाढलेल्या गुन्हेगारीवरही आ. जोरगेवार यांनी आकडेवारी देत वस्तुस्थिकडे सभागृहाचे लक्ष वेधले तसेच पोलीस विभागातर्फे अहेरी येथे नक्षलवादी यांच्या शस्त्र साठ्यावर केलेल्या कारवाही बद्दल गृहविगाचे अभिनंदन केले.

Advertisements
error: Content is protected !!