April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

कमल कोठारी, पटेल यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेतून नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

चंद्रपूर माता महाकाली मंदिर समोर कोठारी, पटेल यांच्या गोडाऊन असलेल्या ठिकाणी आज रात्री 8.30 च्या सुमारास गोडाऊनला अचानक आग लागली. यावेळी आगीचा धूर निघत असल्याचे लक्षात येताच यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याची माहिती लगेच अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यंग चांदा ब्रिगेडच्या या कामगिरी बदल गोडाऊन मालकाने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. तसेच या गोडाऊन मधिल स्टाईल चोरून चोरीचे कृत्य लपवण्यासाठी सदर आग लावली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी *यंग चांदा ब्रिगेड शहर संघटक, करणसिंह बैस, राहुल मोहूर्ले, गौरव जोरगेवार, गीतेश मुसनवार,शुभम धानुका,अंकित चौहान,दीपक अग्रवाल,राजू डाबरे,करण दुर्वे* यांसह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…

Advertisements
error: Content is protected !!