April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

रामनगर पोस्टे हदद्दीत रात्री घडलेल्या खुनातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने तासाचे आत केले गजाआड ०९

काल दिनांक ०३/०३/२०२१ रोजी मृतक सोनु राजु चांदेकर वय २६ वर्ष रा. तुकडोजी महराज चौक बाबुपेठ चंद्रपुर हा बाहेर फिरण्यास गेला असता अरोपी नामे पवन रतन पाटील वय २० वर्ष रा. सम्राट चौक बाबुपेठ चंद्रपुर यांनी पैश्याच्या जुन्या वादावरून चाकुसारखे धारधार शस्त्राने वार करून जिवानीशी ठार केले. फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक २२७/२०२१ कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे हे ०३ पथकासह घटनास्थळी दाखल झाले गुन्हयाची माहीती घेतली सदर वेळी सदर गुन्हयांचे आरोपीची माहीती प्राप्त केली. आरोपीचे नाव प्राप्त करण्यात आले व सदर आरोपीचा शोध चालू केला, सदर अरोपी पवन पाटील असल्याचे माहीती मिळाली सदर अरोपी हा गुन्हा केल्यानंतर त्याचे एक मित्राचे घरी गेल्याची माहीती मिळाली तेथे त्याचे गुन्हयाचे वेळी घातलेले व रक्ताचे माखलेले कपडे बदलुन आंधोळ करून मोटार सायकलवरून मुल तालुक्यातील मारोडा गावी येथे गेल्याची खबर मिळाली त्यावरून सदर गावात जावुन पहाटे मिळालेल्या माहीतीच्या घरी छापा टाकण्यात आला त्यावेळी सदर आरोपी तेथे मिळुन आला त्याची ओळख पटविण्यात आली त्याला ताब्यात घेवुन चौकशी केली त्यावेळी त्याने सदरचा गुन्हा कबुल केला त्यावरून त्यास ताब्यात घेउन त्याला पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर च्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक . बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सफी सुरेश केमेकर, राजेंद्र खनके पोहवा संजय आतकुलवार, नापोशी मिलींद चव्हान, जमीर पठान, अनुप डांगे, अमजद खान . कुदंनसिंग बावरी, संजय वाढई, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोठे, प्रदिप मडावी, मयुर येरणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!