April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त

वरोरा शहरात दारूबंदी विभागाची मोठी कारवाई

काल दिनांक 01/03/2021 रोजी रात्रीच्या वेळी वरोरा तालुका परिसरात अवैध दारु वाहतूकीवर आळा घालण्याकरीता गस्तीवर असतांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा वेटोठा लगतच्या कॅनलजवळ दोन बोलेरो पिकअप मधून दारुसाठा वितरीत होत आहे. अशी माहितीच्या आधारे घटनास्थळी जात असतांना वाहनाचा प्रकाश पडताच क्षणी वाहन चालक घटनास्थळावरुन अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.

दोन्ही वाहनाची झडती घेतली असता 1) वाहन कमांक एम.एच.49 डी. 6131 बोलेरो पिकअप या वाहनामध्ये राकेट देशी दारु संत्रा या बॅन्डच्या 90 मिली क्षमतेच्या एकूण 250 पेट्या 2) वाहन कमांक एम.एन.40 थी.एल. 0336 बोलेरो पिकअप या वाहनामध्ये रॉकेट देशी दार संत्रा या ब्रँड ९0 मिली क्षमतच्या एकूण 200 पट्या अशा एकूण 450 पेट्या मिळुन आल्या. वाहनासह दारूसाठा रूपये 17.20.000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पसार झालेल्या चालकाविरुध्द भ.द. वि का 1949 चे कलम 65(अ).(ई) व 83 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदरची कार्यवाही सागर धोमकर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक अमित वामन क्षिरसागर तसेच विभागाचे शिपाई चेतन अवचट, जगन पुट्टलवार, सुदर्शन राखुंडे यांनी कार्यवाही पार पाडली आहे

Advertisements
error: Content is protected !!