
ताडाळी एम.आय.डी.सी. मध्ये निर्मानाधीन असलेल्या सिद्धपल्ली स्टील प्लांट मध्ये सुरक्षा वाऱ्यावर असल्याने, व सर्व नियमांचे उल्लघन करून आतमध्ये काम सुरु आहे. याच कारणाने कंपनी मध्ये अनेकदा किरकोळ अपघात तर दोनदा मोठे अपघात झाले व त्यात कामगारांना स्वताचा जीव गमवावा लागला आहे.
तसेच स्थानिक रोजगार डावलून बाहेरील आणलेल्या कामगारांची कोणत्याही प्रकारची पोलीस पडताळणी कंपनी व्यवस्थापन करत नसल्याचे समोर आले आहे, आणि ह्यामुळेच जर कोणता अपघात कंपनी मध्ये घडला तर कंपनी त्या कामगाराला कोणताही लाभ न देता सरळ त्याच्या गावी रवाना करीत असल्याचे देखील समजले आहे. व काही कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार देखील दिलेले नसून महागाई व कोरोनामुळे कामगार वर्ग अडचणीत सापडला आहे.
हे सर्व अपघात व मुजोरी ला कंपनी प्रशासन व मालक जबबदार असल्याने त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.जिल्हा अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच येत्या काही दिवसात कामगारांच्या विविध समस्या बाबत मनसेचे शिष्टमंडळ कामगार आयुक्तांची भेट घेणार आहे कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्यास लवकरच मनसे जनआंदोलन उभारणार.मनसे शिष्टमंडळात मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार,महिलासेना जिल्हाध्यक्ष सुनिताताई गायकवाड,मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे,मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,मनसे सचिव मनोज तांबेकर, अर्चना आमटे,करण नायर,मयुर मदनकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
More Stories
चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडणार : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : कठोर निर्बंध लागू: काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
वरोरा शहरात आजपासून जनता कर्फु : सर्व मार्केट बंद