April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी दिली ईको – प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना भेट.

रामाळा तलाव करिता विशेष निधीची मागणी.
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

चंद्रपूर शहरातील गोंडकालीन एेतिहासिक वारसा असलेले रामाळा तलाव प्रदूषण मुक्त व खोलीकरणासह अन्य मागणी करिता ईको – प्रो चे अध्यक्ष . बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती करण्याकरिता माननीय महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी भेट दिली.

दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी इको – प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्याशी भेट करून त्यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. तसेच माननीय महापौरांनी सांगितले की, ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या रामाळा तलावावर माझे विशेष प्रेम आहे. माझ्या कार्यकाळात मी या ठिकाणी सौंदर्यीकरण करून सुंदर रस्ता, स्ट्रीट लाईट, तलावाला स्टीलचे ग्रील व सिंगापूर पॅटर्नचा स्टॅच्यू उभारून सौंदर्यीकरण करण्यात आले.

तलावाची साफसफाई मनपा मार्फत करण्यात येत आहे. तलावात इकॉर्निया असल्याने इकॉर्निया पण मनपाच्या मार्फत काढुन स्वच्छता करण्यात येते. तसेच तलावात प्रदूषण होऊ नये याकरिता गणपती विसर्जनास बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम कुंड लाऊन त्या कुंड मध्ये विसर्जन करतात व भाविकांच्या श्रद्धेच्या विचार करून बाप्पाच्या निर्माल्य निर्माल्य कलशमध्ये जमा करण्यात येते. व आतापर्यंत 7799 मूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. जनतेनेही याला खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे.

तसेच या ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व प्रदूषण मुक्त करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी यांना विशेष निधीची मागणी केली आहे. कोरोना चा काळ असल्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे बऱ्याच खर्च करून कोरोना विषाणुच्या रोकथाम व उपाय योजना करण्यात येत आहे. यात मनपाच्या खूप जास्त प्रमाणात खर्च होत आहेत. ज्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती

Advertisements

खालावली आहे. त्यामुळे या तलावाचे खोलीकरण व इतर कामे करण्यास भरपूर निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. तरी आपण आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी ईको – प्रो चे अध्यक्ष . बंडू धोत्रे यांना केली आहे.
याप्रसंगी मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी, मनपाचे सभागृहनेते संदीप आवारी, ष नगरसेवक .सुभाष कासनगोट्टुवार विशाल निंबाळकर व भाजपा शहर अध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे, श्री ब्रिजभूषण पाझारे, प्रकाशजी धारणे, श्री. दत्तप्रसन्नजी महादानी उपस्थित होते.

Advertisements
error: Content is protected !!