April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

मोटारसायकल चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

एका आरोपीकडुन ३ मोटारसायकल जप्त

पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन आरोपीताना जेरबंद करण्यात आले आहे.

दिनांक २१/०२/२०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी नामे निलेश यशवंत गरगेलवार वय ३६ रा. विठठ्ल मंदीर वार्ड चंद्रपुर याने चंद्रपुर जिल्हयातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन मोटारसायकली चोरी केल्या आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरून तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अमलदार यांना पाचारण करून पथकामार्फत सदर आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन विश्वासाने विचारपुस केली असता त्याने पोलीस ठाणे दुर्गापुर, रामनगर हददीत मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. यावरून आरोपी नामे निलेश यशवंत गरगेलवार वय ३६ रा. विठठ्ल मंदीर वार्ड चंद्रपुर यास अटक करण्यात आली आहे.

 

सदर आरोपीकडुन होंडा अॅक्टीव्हा क. एमएच ३४ बीक्यु २४४०, हिरो पॅशन क, एमएच ३४ एटी ९९०९ हिरो स्प्लेंडर क. एमएच ३४ क्यु ९१५० अशा तिन मोटार सायकली एकुण किं. १.५०,०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जप्त मुददेमालावरून १) पोलीस स्टेशन दुर्गापुर अप क. ४८/२१ कलम ३७९ भादंवि, २) पोलीस स्टेशन रामनगर अप.क. १०२०/२० कलम ३७९ भादंवि चे गुन्हे उघडकीस आले आहे.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक चंद्रपुर  अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक . प्रशांत खैरे, पोलीस निरिक्षक  बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि, बोबडे, पोउपनि, सचिन गदादे, पोहवा संजय आतकुलवार, पोना. चंदु नागरे, अमजद खान, पोशि कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे यांनी केली आहे.

Advertisements

 

 

Advertisements
error: Content is protected !!