
मातृभूमीचा,भारतमातेचा उत्कर्ष हा एकच विचार भारतीय जनता पक्षाचा आहे.हा अनुशासनप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.सत्ताप्रिय नाही तर ही सत्यप्रिय पार्टी आहे.जे यश आज पदरात पडले त्यासाठी अनेकांनी त्याग केला व बलिदान दिले.यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम व सूक्ष्म नियोजन आवश्यक असते.आगामी काळात ते करावे.संघटनात्मकदृष्ठ्या चंद्रपुर जिल्हा दिपस्तंभासारखा व्हावा असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे शनिवार(२०)ला भाजपा (ग्रा)चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीचा समारोप करताना बोलत होते.
या आढावा बैठकीला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,नगराध्यक्ष हरीश शर्मा,भाजपा जेष्ठनेते विजय राऊत,प्रमोद कडू,राजेंद्र गांधी,महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे,प्रदेश कामगार मोर्चा सरचिटणीस अजय दुबे,भाजपा महामंत्री संजय गजपुरे,कृष्णा सहारे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम,माजी आमदार सुदर्शन निमकर,संजय देवतळे,जैनुद्दीन जव्हेरी,उपाध्यक्ष रेखा कारेकर,जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे,महामंत्री नामदेव डाहूले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार म्हणाले,चंद्रपुर जिल्ह्याला पक्षाने भरभरून दिले.भाजपाच्या ६५ संघटनात्मक जिल्ह्यापैकी चंद्रपुर जिल्ह्यावर पक्षाचे विशेष प्रेम आहे.त्यामुळे अनेक पद व मंत्रिपद आपल्याला मिळाली.भाजपाचा विचार घराघरात पोहोचावा म्हणून ही पदं मिळाली.हा आमचा नाहीतर कार्यकर्त्यांचा गौरव होता.पक्षाच्या विचारांवर प्रेम असेल तर पक्ष मोठा होतो.असे ते म्हणाले.
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.