May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

भद्रावती पोलिसांनी पाच लाखांची दारूसाठा जप्त. आरोपी झाला फरार

नागपुर चंद्रपुर मुख्य मार्गावरील कोंढा फाट्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले असता यातील वाहन चालक पसार झाला असून वाहनातील दारूसाठा जप्त करण्यात आला ही कारवाई पहाटे दरम्यान करण्यात आली.

नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली असता एम एच 40 ए 65 60 हे वाहन दारू घेऊन येत असताना पोलिसांची नाकाबंदी पाहून मागेच वळण घेऊन भरधाव वेगाने जात असताना पोलीसांनी पाटलाग केला ते वाहन कोंढा मार्गावर थांबवून यातील वाहन चालक पसार झाला पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात देशी विदेशी दारू किंमत पाच लाख व वाहन असा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला .ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, सचिन गुरनुले  शशांक बदामवार, हेमराज प्रधान ,, केशव चिटगिरे,  यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!