
चंद्रपूर दि. 17, चेहऱ्यावर व्यवस्थीत मास्क न लावता प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयीन परिसरात फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज फटकारले व कोरोनाविषयक बेफीकीरी खपवल्या जाणार नाही असा दम दिला.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलीस आयुक्त अरविंद साळवे यांना प्रशासकीय भवनासमोरून जातांना सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयासमोर नोंदणीकरिता जमलेले कामगार मास्क न लावता व सामाजिक अंतराचे पालन न करता मोठ्या प्रमाणात एकत्र जमलेले दिसले. त्याचवेळी त्यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयातून मास्क बोलावून या कामगार मजूरांना वाटप केले
व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगून विनामास्क बाहेर न फिरण्याचे आवाहन केले. तसेच कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना कामगारांची नोंदणी करतांना कोरोनाविषयक सुरक्षेची खबरदारी घेण्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने व पोलीस अधीक्षक साळवे यांनी प्रशासकीय इमारतीत फेरफटका मारून अधिकारी व कर्मचारी मास्क लावतात की नाही याची पाहणी केली तसेच या ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आलेले आहेत तेथील सुरक्षा यंत्रणेचीदेखील पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसिलदार निलेश गोंड हे देखील त्यांचेसमवेत होते.
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.