March 5, 2021

Maharashtra Metro

online news portal

घुगुस पोलिसांनी सोन्याचे चांदीचे दुकान फोडणाऱ्या आरोपीला केली अटक

अमरावती जिल्ह्यातील तीन आरोपीला व एक यवतमाळ जिल्ह्यातला आहे आरोपीच्या आवडल्या मुसक्या घुगुस पोलिसांनी

घुग्गुस )येथील बँक ऑफ इंडिया जवळ बालाजी ज्वेलर्स हे दुकान असून शुक्रवारला रात्री दरम्यान काही अज्ञात चोरट्यानी शटरचा टाळा तोडून आत प्रवेश केला व 64 हजाराचा ऐवज चोरून नेला.हि घटना शनिवार ला सकाळी दुकानदार सतीश रंगूवार रा.घुग्गुस हे दुकान उघडण्यास गेले असता शटरचा टाळा तोडून दिसला यामुळे त्याला दुकानात चोरी झाल्याचा संशय आला यामुळे त्यांनी येथील पोलिसाना माहिती दिली माहिती मिळताच सहा.पो.नि.मेघा गोखरे,गुन्हे पथकाचे इन्चार्ज गौरीशंकर आमटे,सचिन बोरकर,रंजित भुरसे, निलेश तुमसरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.व सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले असता तीन अज्ञात आरोपी दिसून आले फिर्यादीच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात येऊन चौकशी सुरु करून आरोपी स्वप्नील अशोक चांदेकर (25) रा. सेवा नगर वणी, सूरज अशोक भोगे (25)रा. निंबूनी भोगे ता. धामणगाव रेल्वे, सुनिल उर्फ कैलास गिरी(22 )रा. हिंगणगाव ता. धामणगरव ऋषिकेश अशोक मोहिते (20)रा निंबूनी भोगे यांना कलम 457,380 भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली

 

व त्याच्याकडुन मोबाईल,चांदीच्या अंगठ्या,पल्सर दुचाकी वाहन,असा एकूण 1लाख 10हजाराचा माल हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यातील उर्वरित माल हस्तगत करणे असल्याने न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मध्ये पाठविले पुढील पोलीस अधीक्षक साळवे, उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे इन्चार्ज गौरीशंकर आमटे,सचिन बोरकर मनोज धकाते, प्रकाश येरमे, महेंद्र वनकवार, रंजित भुरसे, सचिन डोये, नितीन मराठे, रवींद्र वाभिटकर यांनी पार पाडली गुण्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे गौरीशंकर आमटे करीत आहे.

Advertisements

You may have missed

error: Content is protected !!