March 5, 2021

Maharashtra Metro

online news portal

अवैध बांबु ताटवे वाहतुक प्रकरणी मेटॉडोर जप्त,

बल्लारशाह दिनांक 10/02/2021 रोजी मेटॉडोर क्र. MH-34 M-2404 मध्ये इटोली गिलबिली या मार्गावर अवैधरित्या सरकारी वनातुन बांबु कापुन त्यापासुन ताटवे तयार करुन वाहतुक करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नामे महेंद्र नामदेव राखुंडे रा. अजयपुर यांना श्री. प्रविण विरुटकर,क्षेत्र सहाय्यक मानोरा, वनरक्षक श्री. प्रविण बिपटे, क्षेत्र सहाय्यक उमरी यांनी सापळा रचुन नमुद मेटॉडोरसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहनात 140 नग ताटवे विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन वाहन व वनोपज जप्त करुन आरोपी महेंद्र नामदेव राखुंडे रा, अजयपुर यांचे विरुदध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (1) ब अन्वये, महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम क्रमांक 41 अन्वये नुसार वनगुन्हा क्रमांक -76/11 दिनांक 10/02/2021 नोंद करण्यात आला. सदर वनगुन्हयाचा तपास संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह यांचे मार्गदर्शनात . प्रविण विरुटकर, क्षेत्र सहाय्यक, मानोरा करीत आहे.

Advertisements

You may have missed

error: Content is protected !!