
सहा ट्रक, पोकलँड मशीन, हायवा व ट्रक जप्त
चंद्रपूर दि.८, जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता दिनांक काल सकाळी 8.30 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथकाने भेट दिली असता मौजा दिंडोरा, प्रकल्प ता. वरोरा वर्धा नदीपात्रामध्ये अवैध रेती/वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर वाहानाची तपासणी करण्यात येवून विना परवाना रेती वाहतूक करणार्या वाहन ट्रक्टर क्र. एम.एच.34/ 9394, एल.4743, एल.0648, एल.9493, बी. आर.4572, बी.एफ.7268 असे एकूण 06 ट्रक्टर, पोकलँड मशीन एक, हायवा क्र. MH-13-JB-1690 व हाफटन ट्रक एम.एच.34 एफ 1549 जप्त करून श्रीमती वर्षा गिरीधर मसारकर, पोलीस पाटील मौजा दिंडोरा, ता. वरोरा यांचे कडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. उक्त वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.