May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय रद्द करा महानगर भाजपाची मागणी

भाजपाचे टाळा ठोका,हल्लाबोल आंदोलन.

चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी,महानगरच्या वतीने महावितरणच्या बाबूपेठस्थित कार्यालयासमोर शुक्रवार(५फेब्रुवारी)ला “टाळा ठोका,हल्ला बोल”आंदोलन ११वाजताच्या सुमारास करण्यात आले.विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा महानगर महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,रवी गुरनुले,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवर, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवी लोणकर,भाजप सचिव रामकुमार अकापेलीवर,सुरज पेद्दुलवार, सुनील डोंगरे,सूर्यकांत कुचनवार,चंदन पाल, विनोद शेरकी, चांदभाई, अमोल नगराळे, पराग मलोदे, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार,उपाध्यक्ष लीलावती रविदास,सचिव रेणू घोडेस्वार,रमिता यादव,भाजयुमोचे आकाश मस्के, राकेश बोमनवार,राजेश कोमल्ला, सचिन लगड, आकाश ठुसे, निश्चय जवादे,महेश कोलावार, बंडू गौरकार, सचिन मुळे व शंकर चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना डॉ गुलवाडे म्हणाले,मागील एक वर्षांपासून देशातील नागरिक कोरोना महामारीमूळे हतबल झाले आहेत.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले.याचा विपरीत परिमाण जनतेच्या आर्थिक व्यवहारावर झाला.लाखो लोकांचे विद्युत देयकही थांबले.शासनाने यात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते.यासाठी भाजपाने राज्यव्यापी आंदोलन केले पण शासनाने कोणतीही सूट आश्वासन देऊनही दिली नाही.

जनता संकटात असताना दरवाढ करून व भरमसाठ बिल पाठवून जनतेची कम्बर मोडण्याचा प्रताप या सरकारने केला.असा आरोप त्यांनी केला.

Advertisements

आता लॉक डाउन संपले आहे.जीवन सुरळीत होत आहे.पण,राज्य सरकार जनतेच्या जीवावर उठले आहे.वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय या निर्लज्ज सरकारने घेतला आहे.हा सरासार अन्याय आहे म्हणून भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपुरला राज्यशासन व महावितरण विरोधात “टाळा ठोको व हल्लाबोल“ आंदोलन करावे लागत आहे,अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे धाडस केले आहे. हा प्रकार चंद्रपुर जिल्ह्यातही होतोय. शासनाच्या इशाऱ्यावर महावितरण द्वारे निर्गमित वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश तात्काळ मागे घेण्यात येऊन जनतेला न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी भाजपाच्या वतीने डॉ गुलवाडे यांनी केली.मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,व याची सर्व जवाबदारी महावितरण व्यवस्थापनाची असेल,अशी चेतावणी त्यांनी दिली.यावेळी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यानीही समयोचित मार्गदर्शन केले.यावेळी आयोजित सभेचे संचालन करून संदीप आगलावे यांनी आभार मानले.

 

आंदोलनात हिरामनी पाल, निशा समाजपती, मुन्नीदेवी निषाद, चंदा रविदास, चांद वर्मा महिला मोर्चाच्या चिंता केवट, ज्योती रामलवार, निर्मला उरकुडे,मीना पारपल्लीवार,सुनीता चव्हाण,निर्मला वर्मा, सुनीता पवार गणेश गेडाम यांनी सहभाग नोंदविला आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले.

Advertisements
error: Content is protected !!