March 2, 2021

Maharashtra Metro

online news portal

सगळ्यात मोठी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज :- राजू यादव यांची अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून केली हत्त्या. रामपुर राजुरा इथली ही धक्कादायक घटना

जिल्ह्यात अवैध धंदे वाढल्याने ग्यांगवॉर वाढली असल्याचे संकेत ?

चंद्रपूर  जिल्ह्यात जणू माफिया राज निर्माण झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकप्रतिनिधीच्या भाडोत्री गुंडा कडून पत्रकारांवर हल्ले होत असताना आता गुंडा गुंडांमधे ग्यांगवॉर होऊन खुलेआम गोळ्या झाडून एकमेकांची हत्त्या करण्याच्या घटना जिल्ह्यात गुंडाराज असल्याची पावती आहे अशीच एक दर्दनाक व खळबळजनक घटना राजुरा येथे घडली असून राजुरा येथील एका हेअर सलून मधे उपस्थित असलेल्या कोळसा व्यापारी व वेकोलि ट्रक चालक-मालक अससोसिएशन राजुरा -बल्लारपूर चे अध्यक्ष राजू यादव (45)रा. रामपूर यांना दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली, ही घटना आज 31 जानेवारी ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली असून यात राजू यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात पोलिसांचा दस्ता घटनास्थळी पोहचला असून आरोपी यांचा शोध सुरू आहे.

Advertisements
error: Content is protected !!