
चंद्रपूर- जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि महामार्गावर सध्या स्टंट बायकिंग करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी यात अधिक वाढ होते. यंदाच्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मोठ्या संख्येत नागरिकांना या स्टंटबाजीचा उपद्रव सहन करावा लागला.
शहरातील मध्यवर्ती बँके समोर अशाच एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाचा स्टंट करताना बाईकवरील ताबा सुटला आणि त्याने अन्य वाहनचालकाला धडक दिली. या धडकेत दुसरा वाहनचालक गंभीर जखमी झाला. मात्र, या जखमी वाहनचालकाला सोडून स्टंट करणारा युवक त्याला सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेत दुसरा वाहनचालक नाव हरदिपसिंग सहानी वय ४३ वर्षे, रा.त्रिमुर्तीनगर, चंद्रपुर गंभीर जखमी झाला. त्याला मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी बायकरचा स्टंट चित्रित करणाऱ्या सहकाऱ्यांनी ही घटना रेकॉर्ड करत चक्क व्हायरल केली आहे. जखमी अवस्थेतील वाहनचालकाला सोडून स्टंट बायकरने पळ काढतानाची दृश्ये देखील यात रेकॉर्ड झाली आहेत.
आरोपी फरार झाले होते त्यानंतर
पोलिसाला माहिती मिळाल्यानंतरच लगेच आरोपीचा शोध घेतला दोन आरोपीला रामनगर पोलिसांनी अटक करण्यात आली
८६/२०२१ भा.दं.वि.स कलम २७९, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) / १७७
आरोपी नामे अब्दुल रफियत अब्दुल रशिद वय २१ वर्षे, रा.बालाजीवार्ड, बल्लारपुर व आरोपीनामे उदय मधुकर तातकोंडावार, वय ५९ वर्षे, शक्तीनगर, उर्जानगर, चंद्रपुर
राम नगर चे ठाणेदार प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली
एपीआय राजगुरू पोहवा देविदास बावनकुळे
मोटारसायकल अथवा चारचाकी वाहनाने स्टंटबाजी कराल तर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.