March 5, 2021

Maharashtra Metro

online news portal

राज्‍यातल्‍या हुतात्‍मा स्‍मारकांच्‍या दुरुस्‍ती व नूतनीकरणाच्‍या प्रक्रियेत योगदान देवु शकल्‍याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर शहरातील हुतात्‍मा स्‍मारकाच्‍या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न

 

भारतभूमीला स्‍वातंत्र मिळवुन देण्‍यासाठी ज्‍या शूर वीरांनी हसतहसत आपल्‍या प्राणांचे बलिदान दिले. अश्‍या शूर वीरांच्‍या, हुतात्‍म्‍यांच्‍या स्‍मारकांच्‍या दुरुस्‍ती व नूतनीकरणासाठी मी अर्थमंत्री असताना सन २०१५-१६ च्‍या अर्थसंकल्‍पात निधी उपलब्‍ध करण्‍याची घोषणा केली होती. हा विषय सामान्‍य प्रशासन विभागाकडे होता. मी वारंवार बैठकी घेवुन याचा पाठपुरावा केला, हुतात्‍मा स्‍मारकांसाठी निधी उपलब्‍ध करुन दिला. जाज्‍वल्‍य देशभक्‍तीचे स्‍फुलींग चेतवणा-या या हुतात्‍मा स्‍मारकांचे नूतनीकरण करण्‍याच्‍या एकुणच प्रक्रियेत मी योगदान देवु शकलो याचा मला अभिमान व आनंद आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्‍ताक दिनी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित हुतात्‍मा स्‍मारक नूतनीकरणाच्‍या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा सभागृह नेते संदिप आवारी, झोन सभापती प्रशांत चौधरी, प्रभागाचे नगरसेवक देवानंद वाढई, सौ. सुनिता लोढीया, नगरसेवक रवी आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, छबु वैरागडे, संजय कंचर्लावार, वंदना तिखे, ज्‍योती गेडाम, शितल कुळमेथे, वनिता डूकरे, माया उईके, सविता कांबळे, शितल गुरनुले, पुष्‍पा उराडे, भाजपा नेते रामपाल सिंह, मतिन शेख आदिंची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, हजारो लाखो शहीदांनी आपल्‍या प्राणांची आहुती देत लोकशाहीचा मंगलकलश आपल्‍या हाती दिला. महाराष्‍ट्रात २०६ हुतात्‍मा स्‍मारके बांधण्‍यात आली आहे. ही स्‍मारके आमच्‍यासाठी उर्जा केंद्रे आहेत. सामाजिक अंधार दुर करण्‍यासाठी या स्‍मारकांचा उपयोग होण्‍याची आवश्‍यकता आहे. मी मंत्री झालो, माझ्या गाडीवर लाल दिवा लागला, तिरंगा झेंडा लागला हे सर्व हुतात्‍म्‍यांच्‍या बलिदानातुन मिळालेल्‍या स्‍वातंत्र्यामुळे शक्‍य झाले. आपल्‍या चंद्रपूर जिल्‍हयाचा स्‍वातंत्र्य विषयक इतिहास मोठा आहे. १६ ऑगष्‍ट १९४२ रोजी चिमुर येथे पहिल्‍यांदा तिरंगा ध्‍वज फडकला. भारत-चिन युध्‍दात तत्‍कालीन मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या रुपाने सहयाद्री हिमालयाच्‍या मदतीला धावला. त्‍याचवेळी महाराष्‍ट्राचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री मा.सा. कन्‍नमवार यांच्‍या रुपाने चंद्रपूर जिल्‍हा सहयाद्रीच्‍या मदतीला धावला. त्‍यावेळी देशात सर्वात जास्‍त सुवर्णदान महाराष्‍ट्राने दिले आणि महाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त सुवर्णदान चंद्रपूर जिल्‍हयाने दिले. मा.सा. कन्‍नमवार १ वर्ष ३ दिवस मुख्‍यमंत्री होते. त्‍याच काळात भद्रावती येथे आयुध निर्माणीची निर्मिती त्‍यांच्‍या पुढाकाराने झाली, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

Advertisements

You may have missed

error: Content is protected !!