May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार 

भद्रावती,दि.२३(तालुका प्रतिनिधी) भद्रावतीकरांच्या स्वागताने मी भारावून गेलो असून वेळेअभावी मी आपल्याशी संवाद साधू शकत नाही,याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इतक्या वेळेपर्यंत आपण माझी वाट बघितली याबद्दल हात जोडून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधण्याकरीता नक्की येईन, असे भावोद् गार राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी काढले.

ते भद्रावती शहराला सदिच्छा भेट देण्याकरीता दि.२२ जानेवारी रोजी भद्रावतीत आले असता बोलले.ना.अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता भद्रावती येथील भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात त्यांच्या स्वागताचा व जनतेशी सुसंवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.परंतू ते दौ-यात खुप व्यस्त असल्याने रात्री १० वाजता त्यांचे भद्रावतीत आगमन झाले.त्यामुळे त्यांना भद्रावतीकरांशी संवाद साधता आला नाही.

शहरातील डाॅ.आंबेडकर चौकात ना.देशमुख यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी देशमुखांचे औक्षवण केले.त्यानंतर भद्रावतीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह संपूर्ण भद्रावतीकरांच्या वतीने ना.देशमुख यांचे स्वागत केले.त्यानंतर बॅंड पथक,

गोंडी नृत्य, फटाक्यांची आतिषबाजी करत रॅली द्वारे खुल्या कारमधून ना.देशमुखांचे भद्रनाग मंदिरात आगमन झाले.तेथे त्यांनी भद्रनाग स्वामीचे दर्शन घेतले.यावेळी विश्वस्त मंडळाकडून त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच रॅलीदरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता खंडाळकर,काळी-पिवळी ट्रॅक्स असोसिएशनचे वजीरभाई यांनी स्वागत केले.

Advertisements

भद्रनाग मंदिराच्या प्रांगणातील व्यासपीठावर ना.देशमुखांचे आगमन होताच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या भद्रावती तालुका आणि शहर शाखेतर्फे भद्रनाग स्वामीची प्रतिमा भेट देऊन व भल्यामोठ्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, युवा नेते फय्याज शेख,जिल्हाध्यक्ष युवराज धानोरकर, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,शहर अध्यक्ष सुनील महाले, राष्ट्रवादी युवक काॅंंग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल लांबट, शहर अध्यक्ष रोहन खुटेमाटे, महिला शहर अध्यक्ष साबिया देवगडे, पनवेल शेंडे, रोहीत वाभिटकर उपस्थित होते.यावेळी ना.देशमुख यांनी भद्रावतीकरांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली व त्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमानंतर ना.देशमुखांनी मुनाज शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.सचिन सरपटवार यांनी केले.तर ना.देशमुख साहेब उशिरा येऊनही नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्य आणि भद्रावती शहर व तालुक्यातील जनता उपस्थित राहिली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करुन मुनाज शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अजय कावडे,अमोल बडगे,ओंकार पांडे,रोशन कोमरेड्डीवार, बिपीन देवगडे, क्रिष्णा तुराणकर,शुभम बगडे,कुणाल मेंढे,आशिष दैवलकर,निलेश जगताप, सूरज भेले, भूषण बोढाले यांनी परिश्रम घेतले.

Advertisements
error: Content is protected !!