May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

कोविड योद्ध्यांच्या भीक मांगो आंदोलनातून जमा झालेले ४०२७ रुपये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ५०० कंत्राटी कामगारांचे मागील ६ महिन्यांपासून थकीत असलेले पगार तातडीने देण्यात यावे तसेच २ वर्षांपासून मंजूर झालेले किमान वेतन लागू करावे या मागण्यांसाठी कोविड योद्ध्यांनी आज जनविकास कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन केले.गांधी चौक चंद्रपुर येथून दुपारी एक वाजता या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो महिला-पुरुष कामगार हातात भिक्षा पात्र व गळ्यात फलक लटकवून आंदोलनामध्ये सहभागी झाले.

 

 

कामगारांसह मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. गांधी चौक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,जटपूरा गेट व कोविड रूग्णालयासमोर ठिय्या मांडून कंत्राटी कामगारांनी भिक मागितली. तसेच मुख्य रस्त्यावरून जाणार्‍या- येणाऱ्या वाहनांना थांबवून सुद्धा भिक मागण्यात आली.

 

 

आंदोलना दरम्यान अचानक आलेल्या श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांनी सुध्दा आंदोलनकर्त्याना आपला पाठिंबा दर्शविला.

सामान्य रुग्णालयामध्ये पप्पू देशमुख व मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात काही कामगार कोविडचे जिल्हा समन्वयक जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निवत्ती राठोड यांच्या कक्षामध्ये जाऊन तिथे उपस्थित वैद्यकीय रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ.भास्कर सोनारकर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता हजारे यांना आपली व्यथा सांगून भिक मागितले.परंतु या तीनही अधिकाऱ्यांनी मौन बाळगून भिक देण्यास नकार दिला.

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून एका चादरवर जमा झालेल्या पूर्ण पैशाचा हिशेब आंदोलनकर्त्यांनी केला.निवेदना सोबत सदर रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देण्याचे जाहीर करून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देऊन त्यांच्या सुचनेनुसार धनादेशाच्या स्वरूपात लेखी अर्जासह निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्याकडे ४०२७ रूपयांचा धनादेश जनविकास सेनेचे प्रफुल बैरम यांच्या नावाने सुपुर्द केला.

 

 

पुढील सात दिवसांमध्ये ६ महिन्याच्या थकीत पगार व किमान वेतनाच्या बाबतीत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला.

 

आंदोलनाच्या यशस्वी करिता जन विकास कामगार संघाचे सतीश येसांबरे,कांचन चिंचेकर,अनिल दहागावकर,राहुल दडमल, ज्योती कांबळे, नीलिमा वनकर , अमोल घोडमारे, सतीश घोडमारे, राकेश मस्कावार, बबीता लोडल्लीवार, भाग्यश्री मुधोळकर, सुनयना क्षिरसागर ,किशोर रोहनकर, रवी काळे ,प्रफुल बजाईत, हर्षल पंदीलवार , सुहास पानबुडे, प्रवीण अत्तेरकर, राज राठोड, विक्की दास ,सरीता खोबरागडे, सुरेखा मडावी, कल्पना शिंदे, , सुनिता रामटेके, कविता सागोरे, सपना दुर्गे, , गीता मून यांनी अथक प्रयत्न केले.

Advertisements
error: Content is protected !!