
राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील 18 वर्षीय रोशन केशव मडावी याचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 17 जानेवारीच्या रात्री घडली हा एकुलता एक मुलगा असल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घराजवळील विहिरीच्या काठावर बसून मोबाईल पाहत असतानाच त्याचा तोल गेला आणि विहिरीच्या खोल पाण्यात बुडुन मृत्यू झाला रात्रीची वेळ असल्याने वाचविणे शक्य झाले नाही असे समजते या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती विरुर पोलिसांना देण्यात आली आज सकाळीच त्या विहिरीतून त्याचा मृत्यूदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी मार्ग दाखल करून शव उत्तरीय कारवाईस राजुराला नेण्यात आले पुढीप तपास विरुर पोलीस करीत आहे
Advertisements
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.