May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

वाहनांचा अपघात करणार्‍या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा

अपघात झाल्यामुळे लाखोंचे नुकसान करणार्‍या चालकांचे प्रकरण शिक्षा किंवा दंडाविना दप्तरबंद पण तिकीट दिले नाही तर ५ वर्ष वेतनवाढ रद्द

 

चंद्रपूर :- प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील शिक्षेचे निर्दयी स्वरुप कालच्या भागात आपण बघितले आहेच पण ह्याच महामंडळात चालकाच्या चुकीमुळे किंवा बेदरकार वाहन चालविण्यामुळे महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाल्यावरही कुठलीही शिक्षा किंवा दंड केल्याशिवाय चालकांना माफ करून त्यांचे प्रकरण दप्तरबंद होण्याचे प्रकार विविध संशय निर्माण करणारे असुन ह्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांत भेदभाव केल्या जात असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत असुन त्यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण होत आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात असलेल्या आगारातील अपघातग्रस्त बसच्या चालकांना लाखोंचे नुकसान होऊनही तसेच प्रवाशांना दुखापत झाल्यामुळे नुकसान भरपाई द्यावी लागूनही तथाकथित वैद्यकीय अहवाल सादर केल्यामुळे निर्दोष मुक्त करून प्रकरण दप्तरबंद करण्याचे प्रकार घडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

 

बसचा अपघात झाल्यावर त्या चालकावर कुठल्या ना कुठल्या प्रकारची कारवाई होणे सामान्य बाब असते व तशी अपेक्षाही असते. परंतु चंद्रपूर विभागीय आगारातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी तथाकथित वैद्यकिय अहवाल ग्राह्य मानून प्रकरण दप्तरबंद केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. असे एखाद्या प्रकरणात झाले असते तर ठीक आहे परंतु अशा प्रकारचे अनेक प्रकरणे दप्तरबंद करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असुन त्यामुळे चालक वैद्यकीय अहवाल प्राप्त करून आपली सुटका करून घेत असल्याचा आरोपही होत आहे.

Advertisements

 

एका प्रकरणात चालकाने हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात घडला असे चौकशीत सांगितले व त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देखिल जोडले असल्याचे कळले आहे. त्यामुळे त्या चालकाला कुठलाही दंड केल्याशिवाय निर्दोष मुक्त करण्यात आले.

 

कोणाचीही तब्येत केव्हाही बिघडू शकते हे जरी खरे असले तरी जर एखाद्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याला अपघात स्थळावरून थेट हृदय रोग तज्ञाकडे तपासणीसाठी नेणे क्रमप्राप्त आहे त्याचप्रमाणे हृदय रोगाचा झटका असलेल्या रुग्णास निदान काही दिवस दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यानंतर गरजेचे असल्यास शस्त्रक्रिया देखिल करावी लागते.

 

ज्या प्रकरणात चालकाने हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे ते प्रमाणपत्र हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कडुन आणल्या गेले का? त्यानंतर तो व्यक्ति त्या दवाखान्यात किती दिवस भरती होता? त्याला किती दिवसांची विश्रांती सांगितली आहे व कर्तव्यावर रूजू झाल्यावर त्याला जोखमीची जबाबदारी देणे योग्य आणि शक्य आहे का ह्याची खातरजमा करून घेण्यात आली का असा प्रश्न निर्माण होत असुन असे घडले नसल्यास झालेला निवाडा संशयास्पद ठरतो.

 

त्याचप्रमाणे अशा प्रकरणात महामंडळाने स्वतःचे वैद्यकीय बोर्ड स्थापन करून त्या कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून अहवाल देणे बंधनकारक असायला हवा मात्र ह्याप्रकारची कार्यपद्धतीचे पालन होताना दिसत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

 

राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार झालेल्या प्रत्येक चुकीसाठी मग ती चुक कोणत्याही प्रकारची असो वा कितीही लहान असो जबर शिक्षा केली जाते मग अशा प्रकरणात सविस्तर चौकशी करून मेडिकल बोर्डद्वारे अहवाल घेऊन मग निर्णय का घेतल्या जात नाही हे कोडे असुन ह्यात काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघातांची चौकशी करताना वैद्यकीय अहवाल प्राधिकृत वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेला असणे बंधनकारक व्हावे जेणेकरून खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून महामंडळाचे होणारे लाखोंचे नुकसान भरून काढता येईल.

Advertisements
error: Content is protected !!