
महिलेची प्रक्रुती गंभीर, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूर सामान्य रुग्णालयात केले स्थानांतर
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या जीवती पोलीस स्टेशन मधे तसे गंभीर प्रकरणे क्वचितच होत असतात पण ठाणेदार संतोष अंबिके हे आल्यापासून जणू अवैध धंदेवाईक यांना चांगले दिवस आले असून सर्वसामान्य माणसाला पोलिसांचा त्रास वाढला आहे कारण अवैध धंदेवाईक यांची पोलिसांशी साठगांठ असल्याने त्यांची दादागिरी चालत असते तर त्यांच्या दादागिरीला बळी पडलेल्या माणसाला पोलिसांकडून सुद्धा मार मिळत आहे.
अशातच आज जीवती पोलीस स्टेशन मधे अंदाजे सायंकाळी 4.30 च्या दरम्यान धक्कादायक घटना घडली असून आपल्या पतीला गुन्हा नसतांना ठाणेदार संतोष अंबिके व पोलीस गुन्हे दाखल करून आतमधे टाकण्याची धमकी देत असल्याची माहिती मिळताच
शेनगाव येथील एका महिलेने स्वतः चक्क पोलीस स्टेशन मधे ठाणेदार यांच्या समोर विष प्रशासन केले असल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
परवीन रामा गोतमवाड वय 26 वर्ष असे विष प्राशन केलेल्या महिलेचे नाव असून प्राथमिक उपचारांकरिता गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात भरती केल्यानंतर रुग्णाची प्रक्रुती गंभीर झाल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारांकरिता भरती करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आईसीयू मधे भरती करण्यात आले असून ठाणेदार संतोष अंबिके यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, ठाणेदार संतोष अंबिके यांनी विरोधकांकडून तब्बल सात हजार घेऊन पिडीत महिलेच्या पतीला जाणीवपूर्वक फसवीण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे महिलेने विष प्राशन केले असल्याची माहिती आहे आता या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमकी भूमिका घेतात याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागलेली आहे .
More Stories
जिल्ह्यात डॉ. भास्कर सोनारकर यांना सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा डोज
वाहनांचा अपघात करणार्या चालकांना अभयदान – न्यायाधिककाऱ्यांचा अजब निवाडा
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर प्रशासनाची धडक कारवाई