April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

मुंगोली कोळसा खदान येथून ओव्हरलोड वाहतूक करणारे व महाराष्ट्र राज्याचा टॅक्स चुकवणाऱ्या दोन हायवा टिप्पर वाहतूक पोलिसांनी केले जप्‍त

मुंगोली खदान येथून ओव्हरलोड वाहतूक करणारे व महाराष्ट्र राज्याचा टॅक्स चुकवणाऱ्या दोन हायवा टिप्पर क्रमांक RJ-21-GC-3020 व RJ-21-GC-4316 ना चंद्रपूर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक श्री हृदयनारायण यादव  यांनी पोलीस ठाणे घुगुस येथे केले जप्त..

 

दि. 06/01/21 रोजी चंद्रपूर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकासह घुगुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत आले असता RJ-21-GB-3020 व RJ-21-GC-4316 राजस्थान पासिंगच्या गाड्या दिसल्याने त्यांनी वाहनांची तपासणी केली. सदरची वाहने नॅशनल परमिट असून महाराष्ट्र राज्याचा टॅक्स न भरता लोकलमध्ये चालवताना निदर्शनास आले तसेच वाहनात ओव्हरलोड माल असल्याने दोन्ही वाहने कार्यवाही करता पोलीस ठाणे घुगुस येथे जमा करण्यात आली आहेत. कार्यवाही करीता अंमलदार विष्णू नागरगोजे, संजय धोटे व विकास मार्कंडे हे होते.. पुढील कारवाई करता प्रकरण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे पाठविल्याचे समजते…..

बाहेर राज्यातून येऊन अवैधरीत्या महाराष्ट्र राज्यात काम करणाऱ्या अवैध वाहनावर कार्यवाहीची ही पहिलीच वेळ आहे..

Advertisements
error: Content is protected !!