
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे तसेच पोर्टल चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील दैनिक, साप्ताहिक तसेच पोर्टल चालकांच्या समस्या व शेतकर्यांच्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन समाप्त झाल्यावर आपल्या रास्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांचे मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बहुभाषिक पत्रकार संघाच्या माध्यमातुन जेष्ठ पत्रकार हरविंदर सिंह धुन्ना ह्यांनी केले होते. ह्या प्रसंगी जेष्ठ पत्रकार श्रीधर बल्की, किशोर पोतनवार, अयुब कच्छी, आशिष रैच हे प्रमुख वक्ता म्हणुन उपस्थित होते तर अन्वर मिर्झा, राजु कुकडे ह्यांनी आपले विचार मांडले.
शासनाने नविन लादलेले २०१८ धोरण जिल्हा वृत्तपत्रांसाठी अन्यायकारक असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एकंदरीत जाहिरातीत झालेला प्रभाव लक्षात घेता विशेषतः शासनाच्या विविध विभागाच्या दर्शनी जाहिराती ‘अ’ व ‘ब’ वृत्तपत्रांनाच देण्यात येतात. त्या पुर्ववत जिल्हा वृत्तपत्रांच्या अनेक तपांच्या सेवा पाहता जिल्हा वृत्तपत्रांनाही अग्रक्रमाने देण्यात याव्या तसेच ई-टेंडरिंगचा प्रघात त्यामुळे वृत्तपत्रांना निविदा सुचना व लिलावाचा जाहिराती चुकीची अंगीकारलेली पध्दत दुरूस्त करून प्रत्येक जाहिरात सबिस्तरपणे जिल्हा वृत्तपत्रांना देण्यात यावी अनेक वर्षापासून शासनाच्या जाहिरात यादित समावेश नसलेल्या बृत्तपत्रांना विशेष बाब म्हणून यादिवर घेण्यात यावे अशी मागणी श्रीधर बल्की ह्यांनी केली.
शासनाने स्थानिक व जिल्हा पातळीवरून वृत्त संकलनाचे कार्य करणार्या पत्रकारांना योग्य तो सन्मान तसेच सुविधा पुरविण्यात याव्या पत्रकारांना वेतन देण्यात यावे अशा आशयाची मागणी अयुब कच्छी ह्यांनी जोरकसपणे मांडली.
पोर्टल न्युज ना वृत्तसंकलनासाठी योग्य त्या सवलती तथा परिचयपत्र देण्यात यावे. पोर्टल साठी शासन स्तरावरून नोंदणी प्रक्रिया सुरू करून सर्व विभागाच्या बातम्या तसेच माहिती पोर्टल चालकांना देण्यात यावी, अत्यंत जबाबदारीने व तितक्याच जलद बातम्या लोकांपर्यंत पोचविण्यासाठी अथक परिश्रम करणार्या पोर्टल पत्रकारांना मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न तत्काळ थांबविण्यात यावा अशी मागणी करतानाच भविष्यातील बातम्यांचे भविष्य न्यूज पोर्टल असुन हे लवकरच शासनाच्या लक्षात येईल असा आशावाद व्यक्त करत चांदा ब्लास्ट चर उपसंपादक आशिष रैच ह्यांनी पुढे सांगितले की आज जवळपास सर्वच आघाडीच्या वृत्तपत्रांना डिजिटल पोर्टल तयार करण्याची गरज भासू लागली असुन काही वृत्तपत्रांनी आपले डिजिटल पोर्टल सुरू केले आहे तर इतर सर्व पोर्टल सुरू करण्याच्या तयारीत आहे. DNA सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने तर आपले छापील अंक काढणे बंद केले असुन ते आता फक्त पोर्टल च्या माध्यमातुन बातम्या प्रसारित करत आहेत ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव व हलाखीची परिस्थिती पाहता व्दिवारषीक तपासणी २०२३ मध्येच करण्यात यावी. स्थानिक ईलेक्ट्रॉनिक्स मिडीयाला जे वार्ता प्रसिध्द करतात त्यांना निकषाप्रमाणे अधिस्विकृती पत्र देण्यात यावी. शासनाने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या जिल्हा स्तरावरील वृत्तपत्रांना पूर्ववत जाहिराती देण्यात याव्या अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर पोतनवार ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केल्या.
वृत्तपत्रामध्ये शासनाच्या बदलीच्या व जन समस्यांच्या वातचे कात्रण पुर्ववर्त जिल्हा माहिती कार्यालया मार्फत त्या त्या विभागांना पाठवावी अशी मागणी जागृत पाठक मंचानी केली आहे.
उपरोक्त मागण्या यथाशिघ्र विचारात घेण्यात याव्या ह्या साठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले व ह्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर ह्यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
ह्या आंदोलनाला संतोष दुधलकर, रोहित तुराणकर, कवेश कष्टी, शरीफ मिर्झा, , हुमायू अली, गणपत पुणेकर, प्रभाकर भट, खुशाल हांडे, दर्शना हांडे, जस्मिन शेख, सरिता मालू, शाम उराडे, नरेश नीकुरे, जसबिर सिंह वधावन, अशोक जाधव, राजु बिट्टूलवार, संजय कन्नमवार, मनोज पोतराजे ह्यांच्या सह अनेक पत्रकार तसेच जागृत पाठक मंचाच्या मंगला भुसारी, नसीम पठाण, रेखा वाघमारे, बिंदू गेडाम, मालावती चक्रवर्ती ह्यांचे सह इतर अनेक
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे