April 23, 2021

Maharashtra Metro

online news portal

पत्रकार दिनानिमित्त दि ६ जानेवारीला वरोऱ्यात व्याख्यान 

 

वरोरा :- मराठी पत्रकारितेचे जनक कथा दर्पणकार दिवंगत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त बुधवार दिनांक ६ जानेवारी रोजी वरोरा येथे पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गालगतच्या आराध्या लॉनमधे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात “आजच्या पत्रकारितेचे बदलते स्वरूप” यावर व्याख्यान होणार आहे. पत्रकार मित्र परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर राहणार असून प्रमुख वक्त्या म्हणून एबीपी माझा या मराठी वृत्त वाहिनीच्या विदर्भ विभाग संपादक सरिता कौशिक यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वरोरा नगरपरिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते, चंद्रपुर प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा दैनिक नवराष्ट्र व नवभारतचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी संजय तायडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे सचिव तथा दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटीक, आजतक या हिंदी वृत्तवाहिनीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी विकास राजूरकर, टीव्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीचे चंद्रपूर जिल्हा

 

प्रतिनिधी निलेश डाहाट, एबीपी माझा या मराठी वृत्त वाहिनीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सारंग पांडे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात अलीकडेच नक्षल ग्रस्त भागात विशेष कार्य केल्याबद्दल राज्य शासनाने पुरस्कृत केलेले वरोरा पोलीस निरीक्षक दीपक खोबरागडे यांचा गौरव आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार केला जाणार आहे. सदर कार्यक्रमाला पत्रकारितेशी निगडीत मान्यवरांनी आणि निमंत्रितांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!