April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश अध्‍यक्ष महेबुब खान यांच्‍या विरोधात भाजपाची चंद्रपूरात निदर्शने

फास्‍टट्रँक कोर्टात खटला चालवावा – महापौर सौ. राखी कंचर्लावार

 

राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश अध्‍यक्ष महेबुब खान यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील एका तरुणीला नोकरीचे आमीष दाखवुन बलात्‍कार केल्‍या प्रकरणी भाजपा चंद्रपूर महानगर, भाजयुमो तसेच महिला आघाडीतर्फे चंद्रपूरात निषेध आंदोलन करण्‍यात आले.

दिनांक 31 डिसेंबर रोजी चंद्रपूरात झालेल्‍या या आंदोलनात महापौर सौ. राखी कंचर्लावार, महानगर भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महिला मोर्चा महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले, प्रज्‍वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, सौ. शिला चव्‍हाण, सौ. शितल गुरनुले, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. माया उईके, सौ. सविता कांबळे, सौ. वंदना जांभुळकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी मेहबुब खान यांनी तरूणीवर केलेल्‍या बलात्‍कार प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्‍याची मागणी व या प्रकरणाचा तपास फास्‍टट्रँक कोर्टात दाखल करण्‍याची मागणी महापौर राखी कंचर्लावार यांनी केली.

 

 

 

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सत्‍तेचा गैरफायदा घेत अशा घटना घडवून आणत आहेत ही अतिशय शरमेची बाब असून हा सत्‍तेचा दुरूपयोग आहे. दोषींना पाठीशी न घालता सरकारने या घटनेची चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी सौ. अंजली घोटेकर यांनी केली. यावेळी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या विरोधात जोरदार निदर्शने करण्‍यात आली. आंदोलनानंतर भाजपा पदाधिका-यांच्‍या शिष्‍टमंडळाने अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले.

Advertisements

आंदोलनात भाजपा महिला आघाडी उपाध्‍यक्षा प्रज्ञा गुळदे, भाजपा महानगर सचिव चंदन पाल, उपाध्‍यक्ष यश बांगडे, साजित कुरेशी, स्‍नेहीत लांजेवार, राहूल पाल, रूपेश चहारे, राजेश यादव, सागर हांडे, आकाश मस्‍के, पवन ढवळे, रामनारायण रविदास, योगेश कुचनवार, आकश ठुसे, सतिश तायडे, प्रणय डंबारे, मनिष पिपरे, राजेश कोमल्‍ला, शुभम सुलभेवार, सोशल मिडीया संयोजक रामजी हरणे, सहसंयोजक संजय पटले, श्‍याम बोबळे, दिपक हूड, सदस्‍य निश्‍चय जवादे, राहूल पिजदुरकर, मतीन दुरटकर, धनंजय मुफकलवार, जितेश वासेकर, हिमांशु गादेवार, सौ. रेणु घोडेश्‍वार, सौ. शुभांगी दिकोंडवार, किरण बुटले, स्‍मीता यादव, माया मांदाळे, ज्‍योती दिंगलवार, लता सुमने, वंदना सुकोसवार, पुनम गरडवार, स्मिता चव्‍हाण आदी भाजपा, भाजयुमो व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Advertisements
error: Content is protected !!