
दिनांक 30/11/2020 रोजी महारोगी सेवा समिती, आनंदवन यांचे सीईओ शितल आमटे-करजगी यांच्या मृत्यु प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा जि. चंद्रपुर या ठिकाणी फौ.प्र. सं. कलम 174 अंतर्गत 101/2020 या क्रमांकाने एमओ उपजिल्हा रूग्नालय वरोरा यांचे तर्फे विशाल खापने गार्ड उपजिल्हा रूग्नालय वरोरा यांचे फिर्यादी वरून आकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा हे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
पोलीस चौकशीमध्ये श्रीमती शितल आमटे-करजगी हया मागील काही वर्षापासुन याकरीता त्या नागपुर येथे मानोसोपचार तज्ञाकडे मागील सहा महिन्यांपासुन औषोधोपचार घेत होत्या. जुन 2020 मध्ये श्रीमती शितल आमटे-करजगी यांनी मानसिक ताणतणावामुळे झोपेच्या गोळ्या घेवुन आत्महत्तेचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी नागपुरच्या वोकार्ड हॉस्पीटल मध्ये उपचार घेतला होता.
दिनांक 21 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे Lethal Injection (प्राण घातक इंजेक्शन) च्या उपलब्धतेविषयी विचारणा केली. यामध्ये त्यांनी काही कुत्रे अल्सरच्या त्रासाने (Incurable pain ) पिडीत आहेत व त्यांना वाचवणेमध्ये काही मुद्दा नाही असे कारण सांगितले. त्यांनी त्यामध्ये त्यांनी तीन प्रकारचे इंजेक्शन मागविले. आनंदवनस्थीत रूग्नालयात अशा प्रकारचे इंजेक्शन सामन्यतः वापरले जात नाही. यामध्ये त्यांनी Neocuron, Kesol, Medzol असे तीन प्रकारचे इंजेक्शन प्रत्येकी 5 असे मागविले. घटनास्थळावरून वरील इंजेक्शन व Neocuron Injecton चे Ampoule फुटलेल्या स्थीतीत व वापरलेली Syringe मिळुन आलेली आहे. घटनास्थळावरून कोणतेही सुसाईड नोट मिळुन आलेली नाही.
पीएम रिपोर्टमध्ये मरणाचे कारण chocking, however viscera and histopathological samples preserved असे कारण देण्यात आलेले आहेत. त्यांच्या उजव्या हातावर Interavenous Injecton चे मार्क दिसुन मिळुन आले आहे. तपासामध्ये घातपात झाल्यासंबंधीचा प्रथम दर्शनी पुरावा दिसुन आलेला नाही. सदर आकस्मीक मृत्यु चौकशी प्रकरणात अद्याप पर्यंत 26 साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आलेले आहेत.
घटनास्थळावरून जप्त मुद्देमाल, व्हिसेरा हा रासायनिक परीक्षणाकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपुर व नागपुर या ठिकाणी पाठविण्यात आलेला आहे. घटनास्थळावरील जप्त 3 मोबाईल, एक लॅपटॉप, एक टॅबलेट हे परिक्षणाकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई या ठिकाणी पाठविण्यात आलेले आहे. वरील दोन्हीही प्रयोग शाळेचे अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहे. अहवाल प्राप्त होताच त्याला अनुसरून योग्य तपास करण्यात येईल. सद्या सदर प्रकरण पोलीस चौकशीवर आहे.
More Stories
1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार