
पोलीस स्टेशन पडोली हददीतील फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणान्या आरोपीस २९ / १२/२०२० रोजी अनुराग दिक्षीत, अतिरीक्त सह. जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन पडोली अंतर्गत दिनांक १२/१२/२०१७ रोजी यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हि घराजवळ असलेल्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेली होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेवुन यातील आरोपी नामे गणेश धर्माजी मुळे वय ४१ रा. लहुजी नगर पडोली चंद्रपुर याने तिला रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपात नेवुन तिचेवर अतिप्रसंग केला. अशा फिर्यादीच्या आणि मेडिकल रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पडोली येथे अप.क. ४३२/२०१७ कलम ३६३,३७६(२) (आय) (जे) भादंवि सहकलम ४,५(एम) ६,८ बा.लै अ.संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन मपोडपनि. अश्विनी वाकडे पोस्टे पडोली यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक २९/१२/२०२० रोजी आरोपी नामे गणेश धर्माजी मुळे वय ४१ रा. लहुजी नगर पडोली चंद्रपुर यास कलम ३७६ (२)(आय)(जे) भादंवि सहकलम ४,५ पोक्सो मध्ये आरोपीला सीआरपीसी कलम २३५(२) नुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा व ५,०००/-रू दंड न भरल्यास ०६ महिने सक्त मजुरीची शिक्षा मा. श्री . अनुराग दिक्षित, अतिरीक्त सह. जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. देवेंद्र महाजन, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन ना. कामदेव उराडे, पोलीस स्टेशन पडोली यांनी काम पाहिले.
More Stories
राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू
महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे
अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई