April 23, 2021

Maharashtra Metro

online news portal

1 जानेवारी २०२१ या नविन नियम लागू येणार असून येणाऱ्या नविन वर्षापासुन विशेष करून महामार्गावर हेल्मेट व सिटबेल्ट सक्तीची कार्यवाही करणार

हेल्मेट दुचाकी व विना सिटबेल्ट चारचाकी स्वारांवर होणार दंडात्मक कार्यवाही

चंद्रपूर जिल्ह्यात २०२० मध्ये नोव्हेबर अखेर एकून ५०८ अपघाताची नोंद झाली असुन प्राणांकीत अपघात १९३ झाले आहेत. त्यात २१४ नागरिकांचा मृत्यु झाला असुन विशेष म्हणजे मृत्यु पडलेल्या एकुन व्यक्तींपैकी ६० टक्के मृत्युचे प्रमाण दुचाकीने प्रवास करणाच्यांचे तर १४ टक्के मृत्युचे प्रमाण कारने प्रवास करणाऱ्यांचे आहे. उल्लेखनिय वाब म्हणजे मृत्यु पडलेल्या दुचाकी स्वारांपैकी कुणीही हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे.

 

जिल्ह्यातील अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी करण्याकरीता दुचाकी स्वारांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांना सिटबेल्ट सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे यांनी घेतला आहे. हेल्मेट व सिटबेल्ट सक्तीची कार्यवाही २०२१ या नविन वर्षापासुन करण्यात येणार असुन विशेष करुन महामार्गावर करण्यात येणार आहे. शिवाय नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना दोन तासांचे समुपदेशन दिले जाणार आहे.

 

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक . अरविंद साळवे यांनी दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहनचालकांनी सिटबेल्टचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

Advertisements
error: Content is protected !!