
उर्जानगर येथे चंद्रपूर तालुका भाजपाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
कोविड योध्द्यांचा सन्मान, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान भारतीय जनता पार्टी म्हणून नागरीकांनी आम्हाला हाक दिली तेव्हा त्यांच्या मागे आम्ही शक्ती उभी केली. पार्टी म्हणजे केवळ निवडणुकी जिंकण्याचे यंत्र नसुन मन जिंकण्याचे यंत्र होण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य जनतेला आनंद देणारे व्यासपीठ होण्याची आवश्यकता आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत १५ ही ग्रामपंचायतींवर भाजपाच्या विचारांचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दि. २६ डिसेंबर रोजी उर्जानगर परिसरातील अयप्पा मंदिरात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुका शाखेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधतांना आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा नेते रामपाल सिंह, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा परिषद सदस्या रोशनी खान, वनिता आसुटकर, विलास टेंभुर्णे, शांताराम चौखे, नामदेव आसुटकर, देवानंद थोरात, हनुमान काकडे, सुभाष गौरकार, संजय यादव, अतुल पोहाणे, चंद्रकांत धोडरे, लोकचंद कापगते, श्रीनिवास जंगम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे