
अंदाजे १०५ ब्रॉस रेती साठ्यासह पोकल्याण मशीन जप्त, चार ते पाच हायवा ट्रक झाले पसार.
वरोरा तालुक्यात रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात नदी नाले व वन विभागातील बंधाऱ्यातून रेती उत्खनन करून शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलाची चोरी केली असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विरोधात मोठे आंदोलन केले होते, मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्या आंदोलनाची दखल घेत महसूल विभागाने रेती घाटावर पटवारी मंडळ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत चौक्या लावल्या होत्या पण त्यांना सुद्धा गुंगारा देत रेती तस्कर मध्यरात्रीच्या वेळी रेती तस्करी करतात ही बाब लक्षात येताच तूराणा नदी घाटावर तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या २ ते ३ च्या दरम्यान धाड टाकून एक पोकल्याण मशीन व जवळपास १०५ ब्रॉस रेती जप्त केली, रेती घाटावर चार ते पाच हायवा ट्रक मात्र फरार होण्यास यशस्वी झाले आहे.
तहसीलदार कोळपे यांच्या या रात्रीच्या कडक थंडीत झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून ती पौकल्याण मशीन व ते हायवा ट्रक कुणाचे ?हा चौकशीचा भाग असला तरी रात्रीच्या वेळी रेती उत्खनन करणारे ते सर्वसाधारण रेती तस्कर नसून त्यांची राजकीय पार्श्वभूमी मजबूत असल्यानेच त्यांची अशी हिंमत होत असल्याची चर्चा आहे. मात्र या कारवाईने तहसीलदार कोळपे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे