April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

जावईने केली सासूच्या घरी चोरी दुर्गापूर परिसरातील घटना

दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहणाऱ्या गंगा विजयकर यांच्या घरी सोमवारी चोरी झाल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस स्टेशनला मिळाली होती. विजयकर यांचे घरून सोन्याचे दागिने एकूण 1 लाख 37 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यानंतर दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधीक्षक. अरविंद साळवे, . प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर सदरची कारवाई यांच्या मार्गदर्शन करण्यात आले

 

दुर्गापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, मनोहर जाधव व सूरज लाटकर यांनी तपास सुरू केला. घरच्यांची विचारपूस केली. मात्र घरात संशयास्पद असं कोणीच आलं नव्हतं. एक जावई आले होते ते चोरी कसे करू शकतील हा प्रश्न सासुबाईसमोर उभा ठाकला. मात्र, पोलीसांची संशयाची सुई त्याच्यावरच होती. चौकशी केली असता यो थातुरमातुर उत्तरे द्यायला लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच पृथ्वी तायडे पोपटासारखा बोलू लागला. आरोपी हा कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील आहे. त्याचे लग्न गंगा विजयकर यांच्या मुलीशी झाले होते. जावयाने आपणच ही घरफोडी केल्याचे कबुल केले आणि सासूबाईला मोठा धक्का बसला. अखेेेर या चोरट्या जावयाला अटक

करण्यात आली. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावर पोलिसांनी भादवी कलम 380 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

Advertisements
error: Content is protected !!