April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेकडुन घरफोडीचे गुन्हे उघडकीस २ लक्ष ४३ हजाराचे सोन्याचे दागीने हस्तगत

दिनांक १७/१२/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालमत्तेविरुध्द झालेल्या गुन्हयांचा शोध घेणेकरीता पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे सोन्याचे दागीने असुन ते त्याने चोरी केलेले आहे. अशा माहितीवरून सदर विधिसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेवुन त्यांचे पालकासमक्ष विचारपुस केली असता, त्यांने कबुली दिली की, पोलीस स्टेशन दुर्गापुर हदीत दोन घरफोडया केल्या होत्या.

यावरून सदर विधिसंघर्षग्रस्त बालकाकडुन पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अप. क, ३८४/२०२० आणि ४१८/२०२० कलम ४५७,३८० भादवि मधील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किं. २२,५००/- रू, ६ ग्रॅम सोन्याचे कानातील टॉप्स किं. २७,०० ०/-रू, ३ ग्रॅम वजनाची सोन्यातील रिंग किं. १३,५००/-रू, ३२ ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसुत्र किं. १,४४,०००/-रू, ६ ग्रॅम सोन्याचे अंगठी किं. २७,०००/- रू. २ ग्रॅम सोन्याची अंगठी कि. ९,०००/-रू असा एकुण २,४३,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस स्टेशन दुर्गापुर येथील घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे.

सदरची कामगीरी . पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, . प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर, स्थानिक गुन्हे शाखा . बाळासाहेब खाड़े यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि, बोबडे, पोउपनि. गदादे, भोयर,  सतिश, प्राजंल, मिलींद, संदीप आणि छगन जांभुळे सायबर पोलीस ठाणे चंद्रपुर यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!