April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

मे.अडोरे कंपनी महाऑष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर व मुख्य अभियंता महा्णिक विद्युत केंन्ट, चंद्रपूर यांचेवरसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे

मे. अडोरे कंपनी महाऔष्णिक केंद्र, या खाजगी कंपनीतील  चंद्रपूर येथे दि. ३१ मे २०२० रोजी बॉयरल संच दुरुस्तीचे काम करतांना अपय व्यवस्थेमुळे ४ कंत्राटी कामगार बॉयलर चे क्लिनींगचे काम करीत असतांना खाली पडून मोठा अपघात घडलेला आहे. त्यातील एक कामगार नामे संदिप लावडे यांची दुर्दैवी मृत्य झाला व ३ कामगार छोटेलाल ग्यानीराम कटरे, विनोद वाळके, सचिन खेरेकर जखमी होऊन अपंग झाले.  अडोरे कंपनी क C. T. P. S येथील आपल्या कंपनी मार्फत कारखान्यामध्ये आपल्या सुरक्षा विभागातर्फे कोणतीही व्यवस्था नसल्याने व महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर विभागातर्फे कोणतीही सुरक्षेची व्यवस्था नसल्याने कामगाराचा मृत्यु ओढवलेला आहे.

 

 

कामगारांच्या सुरक्षाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणाने अपघात होऊन कामगारांचे परिवार रस्त्यावर आले आहे. आपल्या विभागामार्फत नियमाप्रमाणे सखोल चौकशी न करता कंत्राटदाराला मोकळे सोडण्यात आलेले आहे. झालेला अपघात यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे व शासनाच्या कायद्या नियमाचे पालन न केल्याने झालेला असल्याने वरील दोन्हीही जबाबदार संस्थांना दोषी ठरवून त्यांचे मालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.

 

तसेच उर्वरीत कामगार व त्यांचे कटंबास भरपाई देऊन नोकरीत कायमस्वरुपी महाऔष्णिक विद्युत केंद्रात कामावर घ्यावे व मृत्यु झालेल्या कामगारांच्या परिवाराला संबंधीत कंत्राटदारांकडून कंत्राटदरांकडून धाकदपटपणा करून धमकाविण्यात येत आहे त्यांना कोणत्याही कामगार संघटनेकडे जाण्यास मज्जाव केल्या जात आहे.

म्हणून आमच्या संघटनेतर्फे कंत्राटदारानी रुपये २५ लाख नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्यास कायमस्वरुपी नोकरी देण्यासाठी आदेशीत करावे व जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर शासनाने गुन्हा दाखल करावा. अन्यथा म. रा. सु. रक्षक व कं. कर्मचारी सेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी माजी नगरसेवकतथा जिल्हाध्यक्ष  बंडू हजारे व संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.या वेळी जिल्हाध्यक्ष बंडू हजारे,

Advertisements

कैलास टेलतुंमडे,,अमोल मेश्राम, प्रमोद कोलारकर,अमोल भट, मीराबाई कटरे,प्रफुल्ल साबळे उपस्थित होते बंडू हजारे यांनी या वेळी अडोरे कंपनी ने जर कामगारांना कामावर लवकरात लवकर घावे. तसेच मृतुक परिवाराला न्याय मिळवुल देणार अशी माहिती दिली.

Advertisements
error: Content is protected !!